सात्रळ/वेबटीम:- सात्रळ सोनगाव धानोरे पंचक्रोशीतील महावितरण च्या भारनियमानं वीज ग्राहक वैतागलेले असून परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, उद्योजक, छ...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ सोनगाव धानोरे पंचक्रोशीतील महावितरण च्या भारनियमानं वीज ग्राहक वैतागलेले असून परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, उद्योजक, छोटे व्यावसायिक अनियमित भारनियमाबद्दल मेटाकुटीस आली असून परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश पन्हाळे, हंबीर चोरमुंगे, राजेंद्र चोरमुंगे, साळू पडघलमल, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पडघलमल व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
वेळापत्रक नसलेले, कधीही अचानक होणारे भारनियामामुळे, महावितरणउपकेंद्राचा भर नियमासंदर्भात माहिती विचारण्यासाठी केलेला फोनला कर्मचारीनी कधी फोनला उत्तर न देणे, न उचलल्या जाणारा फोन, विहिरीत पाणी असूनही वीज नसल्यामुळे पिके पाण्यावासून वाळून जाणे, प्रचंड उकाडा व त्यात वीज भारनियमामुळे वृध्द, बालकांना, तसेच ग्रामस्तांना होणारा त्रास, गरीब वर्गाला वीज भारनियमामुळे पिठाच्या गिरण्या बंद असल्यामुळे होणारी उपासमार, जनावरांचे पिण्याचे पाण्याचे हाल असे अनेक प्रश्नांना महावितरणच्या अनियमित भर नियमाने त्रास होत असून, महावितरण ने भारनियमाचे वेळापत्रक तातडीने जाहीर करणे गरजेचे असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत