कोपरगाव प्रतिनिधी- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत बापू यांनी दि ५ एप्रिल २०२२ रोजी ब्रह्मगि...
कोपरगाव प्रतिनिधी-
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत बापू यांनी दि ५ एप्रिल २०२२ रोजी ब्रह्मगिरी येथून गोदावरी खोऱ्याचा अभ्यास परिक्रमा दौरा चालू केला असून यांनी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीला मिळणाऱ्या नद्यांची देखील १२ एप्रिल रोजी पाहणी केली अशी महिती गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी दिली.
या दौऱ्याविषयी ढाकणे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, रमाकांत बापू यांनी साधारण दोन ते तीन दिवस तालुक्यातील गोदावरीला येऊन मिळतात अशा उपनद्यांचा अभ्यास केला त्यामध्ये उत्तर बाजूला धामोरी येथील गोइ, सांगवी भुसार आणि रवंदाच्या मधील काळधोंडी, रवंदे मधील अगस्ती नदी, संजीवनी कॉलेजच्या जवळील गार्दी, शिंगणापूर जवळील नारंदी नदी
तर दक्षिण बाजूची देर्डे फाट्यावरील उमरावती नदी, झगडे फाट्या जवळच असलेला खडकी नाला, चांदेकसारे येथील देव नदी या उपनद्यांची पाहणी या अभ्यास दौऱ्यात केली.
या गोदावरी नदीच्या उपनद्यांचा अभ्यास दौऱ्यात मधुमालती जोशी , सूर्यवंशी सर सुनीता इंगळे मॅडम,के जे सोमय्या कॉलेज चे प्राचार्य यादव सर शिक्षक रवींद्र जाधव, साळुंके सर, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आदी सह उपनद्या असलेल्या गावातील स्थानिक नागरीकासोबत सर्व उपनद्या विषयी माहिती घेतली.तसेच या दौऱ्यात लक्षात आले की उत्तरेकडील सर्व उपनद्यांचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि मनमाड या डोंगर रांगातील आहे.साधारण कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी ला येऊन मिळनाऱ्या ८ नद्यांचा अभ्यास केला असून लवकरच या सर्व उपनद्यांचा लांबी व उगम आदी महत्वाच्या बाबीचा
अभ्यास जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत बापू व गोदामाई प्रतिष्ठान करणार असल्याचे ढाकणे यांनी या वेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत