कोपरगाव बस स्थानकाचे नामकरण करण्याचा अधिकाऱ्यांना विसर- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव बस स्थानकाचे नामकरण करण्याचा अधिकाऱ्यांना विसर- अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव बस स्थानकाच्या नवीन इमारतीला छ शिवाजी महाराज बस टर्मिनस असे नाव द्यावे अशी मागणी केली होती मात्र आजून तरी नामकरण कर...

कोपरगाव/वेबटीम:-




कोपरगाव बस स्थानकाच्या नवीन इमारतीला छ शिवाजी महाराज बस टर्मिनस असे नाव द्यावे अशी मागणी केली होती मात्र आजून तरी नामकरण करण्याचा विसर पडला असल्याचे दिसून येते असे लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
मागील एक दोन वर्षांपूर्वी कोपरगाव बस स्थानक इमारतीचे काम सुरू असताना या इमारतीस *"छत्रपती शिवाजी महाराज बस टर्मिनस"* असे नामकरण करावे अशी मागणी केली होती
कोपरगाव बस स्थानक हे औरंगाबाद,धुळे व नगर या महामार्गावरील सर्वात मोठे बस स्थानक असून कोपरगाव बस आगाराच्या अखत्यारीत शिर्डी बस स्थानकाचा कारभार चालतो त्यामुळे मुंबई व महाराष्ट्रातील अनेक बस आगाराच्या गाड्या व प्रवासी या बस आगार मधून ये जा करत असतात त्यामुळे यापूर्वी लोक स्वराज्य आंदोलन, महाराष्ट्र नव निर्माण सेना,बाबा राजे मित्र मंडळ आणि कोपरगाव येथील अनेक सामाजिक संघटनांनी कोपरगाव बस आगाराच्या नवीन इमारतीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामकरण करावे अशी मागणी केली होती तसे लेखी निवेदन वेळोवेळी या संघटनांनी दिले होते
मागील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री व अर्धा डझन मंत्र्यांच्या उपस्थितीत या नवीन इमारतीचे आजी माजी आमदारांनी श्रेयवाद घेत उदघाटन पार पडले तसेच या इमारतीच्या मुख्य भागावर आपल्या नावाच्या कोनशीला लावल्या गेल्या मात्र एक दीड वर्षांपूर्वी मागणी करून देखील या इमारतीस  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामकरण करण्याची सुबुद्धी कोणत्याच प्रस्तापित नेते व बस आगारचा अधिकारी वर्गास झाली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल तसेच या पूर्वी जुन्या बस आगारात छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या व दरवर्षी या महामानवांच्या जयंती पुण्यतिथी निमित्ताने या महामनवाना अभिवादन केले जात होते मात्र आजून त्या प्रतिमा देखील लावलेल्या दिसत नाही त्यामुळे बस व्यवस्थापक यांनी त्वरित या महामानव यांच्या प्रतिमा बसवून बस स्थानक इमारतीस छत्रपती शिवाजी महाराज बस टर्मिनस असे नामकरण करावे असे या पत्रकात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत