कोपरगाव/वेबटीम:- थोर समाजसेवक संजय काळे यांचे आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबार नावाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात हे अधिकारी भाजपाच्...
कोपरगाव/वेबटीम:-
थोर समाजसेवक संजय काळे यांचे आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबार नावाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात हे अधिकारी भाजपाच्या इशाऱ्यावर तुम्हाला बदनाम करण्याचा डाव करत आहे असे अजब विधान बघून संजय काळे हे आमदार काळे यांचेच हस्तक आहे अशी चर्चा जनतेत सुरू आहे असे टीकास्त्र भाजपा जिल्हा सचिव कैलास खैरे यांनी केले आहे.
थोर समाजसेवक काळे यांचे सगे-सोयरे नातेवाईक कोळपेवाडी कारखान्याचे लाभार्थी असल्याने व त्यांचे मद्य व्यवसायाशी निगडित आर्थिक व्यवहार असल्याने आप्तेष्टांच्या सोयीसाठी संजय काळे साहेब यांनी भाजपाचे नाव घेऊन वीज प्रश्नावर नौटंकी करणे म्हणजे ते आमदार काळे यांचे हस्तक आहेत असे सिद्ध करून आपला खरा चेहरा उघड केला अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.हेच समाजसेवक इतर वेळी समाजसेवक म्हणून सोयीच्या विषयांत टीका करतात व विशिष्ट राजकीय गटाला फायदेशीर भूमिका घेतात हे लपून राहिलेले नाही.काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दौऱ्याच्या वेळी एका रात्रीत शहरात रस्त्यावर डांबर पसरले गेले आणि परदेशी तंत्रज्ञान अंधारात कोपरगावच्या रस्त्यांवर अवतरले यावर संजय काळे यांनी चकार शब्द काढला नाही.
कोपरगाव तालुक्यातील विजेची समस्या गंभीर झाली आहे,यात अधिकारी व भाजपा पक्षाचा संबंध जोडणे म्हणजे हास्यास्पद पराक्रम आहे.सत्तेत कोण ?कुणाचे पाहुणे वीज मंत्री ? मग तरीही कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे गेले 24 दिवस अंधार का ? यावर संजय काळे साहेब यांची वर्तमान महाभारतातील संजयची दुगलबाज दिव्यदृष्टी कुणाकडे गहान पडली आहे हे जनतेला सांगण्याची गरज उरली नाही.
कोरोना काळात रेमडीसीव्हीर हे काळ्या बाजाराने पन्नास पन्नास हजाराला विकले गेले तेव्हा त्या व्यवसायाच्या निगडित असुनही आपण मौन का बाळगले हे कोडे आता उलगडले आहे.कोणाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मेडिकल व्यवसाय आहेत त्यानी कोरोना काळात काय केले होते व समाजसेवक संजय काळे साहेब तेव्हा का गप्प राहिले होते हे उगड पडले आहे.नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतांना यांची वाचा निशब्द का होती हे सत्य उजेडात आले आहे.
समाजसवेक नावाचा वापर न करता संजय काळे यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून छुपी असलेली भूमिका उघड घ्यावी असे मत जनतेत वर्तविले जाऊ लागले आहे.विजेचा प्रश्न सुटण्यासाठी सत्ताधारी अपयशी आहे यावर बोलण्याची हिंमत संजय काळे यांच्यात नाही कारण तसे केले तर आमदार काळे त्यांच्या नातेवाईकांना असणारे लाभ थांबवतील या भीती पोटी तर ही सारी वक्तव्ये केली गेली नाहीत ना ? असा खरपूस समाचार भाजपा जिल्हा सचिव कैलास खैरे यांनी संजय काळे यांचे नाव न घेता घेतला आहे.
- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मी इन्व्हर्टर घेतले नाही हे संजय काळे स्वतःच म्हणाले आणि परत भाजपाच्या इशाऱ्यावर अधिकारी वागतात असे म्हणणारे संजय काळे यांचा भूमिकांचा गोंधळ झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना सध्याच्या गलथान कारभाराशी होऊ शकत नाही कारण विद्यमान सरकार व लोकप्रतिनिधी हे निष्क्रिय आहे - कैलास खैरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत