सोनगाव/वेबटीम:- दरवर्षी साजरा होणारा श्रीराम नवमी उत्सव गेल्या दोन वर्षांपासून कोरोना रोगामुळे साजरा झाला नसल्याने, चालू वर्षी अतिशय आनंदी व...
सोनगाव/वेबटीम:-
दरवर्षी साजरा होणारा श्रीराम नवमी उत्सव गेल्या दोन वर्षांपासून कोरोना रोगामुळे साजरा झाला नसल्याने, चालू वर्षी अतिशय आनंदी वातावरणात प्रभूश्रीराम भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. ह्या दिवशी सकाळी सात वाजेपासून आकरा यजमान जोडप्यांच्या हाताने श्रीराम मूर्ती अभिषेक पूजा केली गेली. त्यानंतर मंदिरातील सर्व मूर्तींना पुष्पहार अर्पण करून, फराळ प्रसाद देण्यात आला. सकाळी दहा वाजता हभप अनिल महाराज लोखंडे यांचा प्रवचन कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता भजनी मंडळाच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसाद घेऊन भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्सव साजरा झाला.
या उत्सवाचे आयोजन ऋषि पाटील अंत्रे, गटनायक राष्ट्रिय स्वयंसेवक संघ तथा अध्यक्ष साई वृंदावन सेवा प्रतिष्ठान, सोनगाव यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून नियोजन केले.या उत्सवासाठी लक्ष्मण अंत्रे, दिलिप अंत्रे, अनिल अंत्रे, हारकुदास अंत्रे, मच्छिंद्र अंत्रे, आण्णासाहेब ताजणे, नारायण धनवट, भाऊसाहेब अंत्रे, एकनाथ शिंदे आदींनी मोलाचे योगदान दिलेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत