कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव पीपल्स बँकेचे ज्येष्ठ सदस्य व गेली 50 वर्षे संचालक असलेले कै. रतनचंदजी ठोळे यांचे नुकतेच निधन झाले होते त्यांच्या ...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव पीपल्स बँकेचे ज्येष्ठ सदस्य व गेली 50 वर्षे संचालक असलेले कै. रतनचंदजी ठोळे यांचे नुकतेच निधन झाले होते त्यांच्या बँकेतील योगदानाची दखल घेऊन संचालक मंडळाने त्यांची प्रतिमा बँकेच्या कार्यालयात लावण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला होता .
त्यानुसार सहा एप्रिल 22 रोजी एका कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी ठोळे कुटुंबातील सदस्य व कै. रतनचंदजी ठोळे यांच्याबरोबर काम केलेले ज्येष्ठ सदस्य श्री दत्तात्रेय कंगले ,श्री कांतीशेठ अग्रवाल, श्री माणिकचंदजी बागरेचा , श्री ताराचंदजी गंगवाल ,श्री अजितशेठ लोहाडे इ.मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी जनरल मॅनेजर एकबोटे साहेब यांनी प्रास्ताविक केले
बँकेचे चेअरमन सत्यम मुंदडा यांनी कै. रतनचंदजी ठोळे यांनी बँकेत दिलेले योगदान कायम आमच्या स्मरणात राहील असे सांगितले तसेच श्री दत्तात्रय कंगले व अजितशेठ लोहाडे यांनी कै. रतनचंदजी ठोळे यांच्या आठवणींना उजाळा दिला व बँकेने चांगला कारभार करावा असे सांगितले ज्येष्ठ संचालक श्री कैलासशेठ यांनी ठोळे परिवाराच्या वतीने संचालक मंडळाचे आभार मानले संचालक धरमभाऊ बागरेचा यांनी उपस्थितांचे आभार मानले
याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन सौ प्रतिभा शिलेदार , संचालक अतुल काले ,कल्पेश शहा, हेमंत बोरावके ,डॉक्टर विजय कोठारी, श्री सुनील कंगले, एडवोकेट श्री भोकरे, सौ प्रभावती दीपक पांडे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत