कोपरगाव/वेबटीम:- युवा नेते आकाश नागरे यांच्या शिफारशीप्रमाणे धोत्रे येथील माजी सरपंच विष्णू एकनाथ पाडेकर यांची कोपरगाव तालुक्यातील काँग्रेस ...
कोपरगाव/वेबटीम:-
युवा नेते आकाश नागरे यांच्या शिफारशीप्रमाणे धोत्रे येथील माजी सरपंच विष्णू एकनाथ पाडेकर यांची कोपरगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति असलेली तळमळ, प्रेम, निष्ठा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न सोडवण्याची हातोटी बघून त्यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा किसान काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विष्णू पाडेकर यांची कोपरगाव किसान काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड केली आज संगमनेर येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कोपरगाव काँग्रेसचे युवा नेते आकाश नांगरे , अहमदनगर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले, कोपरगाव काँग्रेस(अ.जा.) विभागाचे शहराध्यक्ष रवींद्र साबळे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विष्णू पाडेकर यांची निवड करून पत्र दिले. याप्रसंगी नामदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा पूर्ण मदत माझ्याकडून दिली जाईल असे सांगितले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि युवा नेते आकाश नागरे यांच्या नेतृत्वाखाली मी आगामी काळात कोपरगाव येथे किसान काँग्रेसचे संघटन करून प्रयत्न करील असे प्रतिपादन विष्णू पाडेकर यांनी केले. विष्णू पाडेकर यांची किसान काँग्रेस कोपरगाव अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, डॉ सुधीर तांबे, आ.लहू कानडे, सत्यजित दादा तांबे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, तालुका उपाध्यक्ष दिलीप शिंदे, सोन्याबापु निकम, बंटी यादव, निखिल पापडीजा, शितल देशमुख,शब्बीर शेख, आदी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत