राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील श्री. क्षेत्र तांभेरे येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात पार पडला. तांभेरे येथ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील श्री. क्षेत्र तांभेरे येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात पार पडला.
तांभेरे येथे श्रीराम मंदिरात आज सकाळी विधिवत पूजन संपन्न झाले.त्यानंतर ह.भ.प.किरण महाराज ठोंबरे यांचे सुश्राव्य किर्तन पार पडले.
यावेळी भाविकांची मोठी गर्दी होती. त्यानंतर ५ वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा पार पडला.यावेळी प्रख्यात मल्लानी कुस्त्याच्या आखाड्याप्रसंगी हजेरी लावली. दिवसभर प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. रात्री ह.भ.प विवेकानंद महाराज मिसाळ यांचे किर्तन संपन्न झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत