आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील दवणगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रभाकर रामदास होन तर व्हा. चेअरमनपदी पुष्पा नानासाहेब पां...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील दवणगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रभाकर रामदास होन तर व्हा. चेअरमनपदी पुष्पा नानासाहेब पांडागळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दवणगाव सेवा संस्थेची निवडणूक संपन्न होऊन जय हनुमान ग्रामसुधार मंडळाने १२ पैकी १२ जागा जिंकुन विजय मिळविला होता. दोन्ही पदांकरिता एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आगळे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.
त्यांना सचिव कृष्णा मगर यांनी सहकार्य केले. यावेळी संचालक अशोक कासार, पंढरीनाथ पागीरे, नारायण खपके, बाबासाहेब होन, बाळासाहेब थोरात, नंदकुमार महाडिक, दिलीप जऱ्हाड, चंद्रभागा खपके, बजरंग साळुंके, अशोक भोसले हे संचालक उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची अतिषबाजी केली. या निवडीकामी सरपंच मेजर भाऊसाहेब खपके, पोलिस पाटील नंदकुमार खपके, कुंडलीकराव खपके, दादासाहेब महाडिक, उपसरपंच गोकुळदास साळुंके, बाळासाहेब पागिरे, शिवाजी होन, भाऊसाहेब होन, सयाराम जऱ्हाड, पांडुरंग कासार, बाळासाहेब पांडागळे, भानुदास थोरात, शंकरदादा साळुंके, वारनाथ कासार, चंद्रकांत पागीरे सतिष महाडिक, भरत थोरात, संजय होन, किशोर होन, एकनाथ जऱ्हाड, संदिप जऱ्हाड, पोपट भोसले, जॉन भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत