कोपरगाव(वेबटीम) देशाचे व राज्याचे नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर ...
कोपरगाव(वेबटीम)
देशाचे व राज्याचे नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर एस.टी.कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली दगडफेक महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभणीय असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
शरदचंद्रजी पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार (दि.९)रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ना. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करून या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारावर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देण्यात आले.
पुढे बोलतांना ना.आशुतोष काळे म्हणाले की,आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु पवार साहेबांच्या घरावर करण्यात आलेली दगड फेक अशा प्रकारचे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाला अभिप्रेत नाही.त्यामुळे असे आंदोलन महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय आहे.२०१९ ला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाले.त्यावेळी विरोधी पक्षाला हे सरकार जास्त दिवस सत्तेत राहू शकत नाही अशी त्यांची भावना होती परंतु सरकार पाडण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न होऊन देखील सरकार पडण्याऐवजी मजबूत होत आहे.पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकारने कोरोना सारख्या आपत्तीचा यशस्वी मुकाबला करून अडीच वर्षाचा काळ पूर्ण केला असून हे सरकार पाच वर्ष राज्यात राहणार आहे.कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने अतिशय चांगले काम करून कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर जनहिताचे अनेक चांगले निर्णय घेतल्यामुळे जनतेच्या मनात सरकार विषय आपुलकी निर्माण झाली आहे त्यामुळे या सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले.परंतु त्यामध्ये विरोधी पक्षांना यश मिळाले नाही त्यामुळे अशा प्रकारचे हल्ले करून सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयोग होता. हल्ला झाल्यांनतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सर्वप्रथम सोशल मिडीयावर प्रतिक्रिया आल्या यावरून त्यांना या हल्ल्याबद्दल पूर्व कल्पना होती का? असा संशय निर्माण होत असून या हल्ल्यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेवून कडक कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या बाबतीत असे कृत्य घडणार नाही. त्यामुळे अशा भ्याड हल्ल्याचा कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, जिनिंग व प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, हाजीमहेमूद सय्यद, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, रोहिदास शिंदे, देवेन रोहमारे, सचिन आव्हाड, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, प्रफुल्ल शिंगाडे, मायादेवी खरे, अशोक आव्हाटे, डॉ. तुषार गलांडे, प्रकाश दुशिंग, इरफान शेख, संदीप कपिले, डॉ. शिवाजी रोकडे, विकासजी बेंद्रे, मुकुंद इंगळे, मनोज नरोडे, आकाश डागा, अॅड.मनोज कडू, जय बोरा, राजेंद्र जोशी, योगेश नरोडे, गोरख वैद्य, महेश उदावंत, दिनेश संत, सचिन वैद्य, बाळासाहेब गोर्डे, लव सुपेकर, कैलास मंजूळ, ओम बोराडे, प्रसाद रुईकर, ऋतुराज काळे, रितेश राऊत, रवींद्र राऊत, विशाल जगताप, संतोष शेजवळ, सागर लकारे, सुनील देवकर, प्रदीप कुऱ्हाडे, शुभम लासुरे, हारुण शेख, सोमनाथ गायकवाड, छाया फरताळे, शितल वायखिंडे, राणी बोर्डे, कमल पवार, कैसाबाई घोनघर, रूपा कळसकर, पूनम पाटोळे, भाग्यश्री बोर्डे, दिक्षा उनवणे, चंद्रभागा हिंगे, मीरा साळवे, सुषमा पांडे, भाऊसाहेब देवकर, छगन देवकर, संजय देवकर, रोशन शेजवळ, शुभम शिंदे, शैलेश साबळे, सचिन गवारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत