सात्रळ/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील अग्रगण्य असलेली तसेच आर्थिकरित्या सक्षम असलेली सात्रळ ग्रुप वि.वि.का. सोसायटी च्या अध्यक्षपदी ऍड. ...
सात्रळ/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील अग्रगण्य असलेली तसेच आर्थिकरित्या सक्षम असलेली सात्रळ ग्रुप वि.वि.का. सोसायटी च्या अध्यक्षपदी ऍड. बाळकृष्ण बापूजी चोरमुंगे यांची तर उपाध्यक्षपदी अतुल भिमराज ताठे यांची बिन विरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विखे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी ची निवड सभा निवडणूक अधिकारी एस. पी. धनवडे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थाच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षपदासाठी ऍड. बाळकृष्ण चोरमुंगे यांना नाव संस्थेचे जेष्ठ सदस्य वसंतराव डुक्रे व दिलीपराव ज्ञानदेव डुक्रे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी अतुल ताठे यांचे नाव संजय नागरे व प्रकाश ताठे यांनी सुचवून दोन्ही पदांची निवड बिनविरोध झाली. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्यबाळकृष्ण चोरमुंगे दिलीप ज्ञानदेव डुक्रे, वसंतराव भाऊसाहेब डुक्रे, गोरख जयराम घोलप, विलास दादा घोलप, सुभाष कारभारी दिघे, प्रकाश लक्ष्मण ताठे, संजय पांडुरंग नागरे, अतुल ताठे, उज्ज्वला विजय डुक्रे, मंदाकिनी दिलीप डुक्रे, चांगदेव गोपाळा पडघलमल उपस्तिथ होते. निवडणूक प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप मैहसकर यांनी काम पहिले तर सोसायटी चे निवृत्ती शिंदे व अनिल मुसमाडे यांनी त्यांना सहकार्य केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्या याप्रसंगी सत्कार प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था चे संचालक ऍड. अप्पासाहेब दिघे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षपदी बाळकृष्ण चोरमुंगे, व उपाध्यक्ष अतुल भिमराज ताठे यांचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत