देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा सोसाटीचे १९४ सभासदांचे सभासदत्व रद्द करणेसाठी राहुरीचे सहा निबंधक सहकारी संस्था यांचेकडे काही लोकांनी ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा सोसाटीचे १९४ सभासदांचे सभासदत्व रद्द करणेसाठी राहुरीचे सहा निबंधक सहकारी संस्था यांचेकडे काही लोकांनी दिलेल्या तक्रारी वरून देवळाली सोसाटीच्या १८४ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात आले असले तरी मतदार यादीतील केवळ ५४ सभासदांचे सभासदत्व रद्द होऊ शकते अशी माहिती सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक शहाजी कदम यांनी दिली.
सहा.निबंदक यांचे कडे अपील केलेल्या एकूण १९४ सभासद पैकी दीपक नागरगोजे सहा. निबंधक सहकारी संस्था राहुरी यांनी दि. ७ एप्रिल २०२२ रोजी देवळाली प्रवरा विविध कार्य. सेवा.सह. संस्था. मर्या. ता. राहुरी या संस्थेचे १८४ सभासद अधिनियमा नुसार आणि संस्थेच्या उपविधि नुसार सभासदत्वासाठी आवकश्यक ती पात्रता पूर्ण करीत नाहीत. या कारणाने अधिनियमातील तरतुदीतील कलम २५ अ नुसार संस्थेस १८४ सभासदांची नावे कमी करण्याचे निदेश दिले होते
याबाबत पुढे बोलताना शाहजी कदम म्हणाले की ज्या १९४ सभासदांना अपात्र ठरविण्यासाठी गावातील स्वतःला समाजसेवक म्हणून घेणाऱ्या बिगर अभ्यासू लोकांनी सहा.निबंदक यांच्या कडे अर्ज केला होता त्याचा निकाल आल्यावर आपण खूप तिर मारला या दृष्टीने ते लोक बातम्या पसरवीत आहे मुळात १९४ सभासदांपैकी ८४ सभासद हे मयत होते ४३ सभासद हे पूर्वी पासूनच अपूर्ण शेअर्स (नाममात्र) असल्याने पात्र नव्हते राहिले ६४ त्यातील काही अपिलात जाऊन सर्व कागदपत्र पूर्ण करून १० सभासद पात्र झाले म्हणजे केवळ ५४ सभासदच अपात्र ठरले आहे आणि ते देखील पुढील अपिलात जाणार असल्याचे या वेळी कदम म्हणाले.
पूर्वीच्या काळी गावातील व्यापारी लोक संस्था चांगली चालावी म्हणून संस्थेस ठेवी देत असत त्यामुळे त्यांना सभासद करून घ्यावे लागत तसेच काहींना तसेच छोट्या व्यापाऱ्यांना संस्था खावटी कर्ज वाटत असत त्यामुळे त्यांना देखील सभासद करून घेतले गेले होते या कारणाने अपात्र ठरलेल्या सभासदांमध्ये व्यापारी सभासद जास्त आहे पुढे बोलताना कदम म्हणाले गावातील ठराविक चौकटी सभासदांची दिशाभूल करत आहे सत्य परिस्थिती वेगळी आहे सभासदांनी यावर विश्वास ठेवू नये अपात्र ठरलेले सभासद हे कोणत्याही एका राजकीक गटाचे नव्हते अपात्र ठरलेले सभासद सोडूनच मतदार यादी बनवली गेली होती त्यामुळे त्याचा कुठल्याही परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होणार नाही असे यावेळी कदम म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत