कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ अनेक वर्षांपासून का...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि उपक्रमशील निरंतर कार्य लहान मुलांना प्रोत्साहन देत असतात.हे कौतुकास्पद असल्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी सांगितले.
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने श्रीमंंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान,सूर्यतेज कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद् अहमदनगर जिल्हा शाखा (ग्रामिण), बाल रंगभूमी परिषद,आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल, कोपरगाव,अहमदनगर जिल्हा शाखा,कलाशिक्षक,कोपरगाव तालुका यांचे विशेष सहभागातून शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धा - २०२२ चा पारितोषिक वितरण समारंभ जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ञ डॉ.शांताराम आढाव,स्रीरोग तज्ञ डॉ.जयश्रीताई आढाव, आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ.हर्षद आढाव, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला उपस्थितांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.त्यानंतर भारतीय किसान संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंतराव वहाडणे (पुणतांबा) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेशराव पाटील म्हणाले, सहभागी स्पर्धकांनी अशाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.आपल्यातील सुप्त कलागुणांना विकसित होण्यासाठी ही संधी असल्याचे सांगितले.तर प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.जयश्रीताई आढाव यांनी स्पर्धकांनी साकारलेल्या शिवसंदेश भेटकार्डचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली..
भारतीय टपाल विभागाचे पोस्ट कार्ड वर छत्रपती शिवाजीराजे यांचे विचार सहभागी स्पर्धकांनी शिवसंदेश द्वारे साकारले आहे.या स्पर्धेत सुमारे १२०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.यातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि गुणवत्ता स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि झाडाचे रोप देण्यात आले.बक्षीस विजेत्यांना भारत सरकार आयुष मंत्रालयाचे निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्नजी शेटे यांचे स्वाक्षरी प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलचे डॉ.हर्षद आढाव,शिवसंदेश स्पर्धा समितीचे प्रा.अनिल अमृतकर,प्रा.अतुल कोताडे,प्रा.प्राजक्ता राजेभोसले,प्रा.मतीन दारुवाला,अनंत गोडसे,प्रा.भोसले,प्रा.शिवानी गवळी,गौरी दिवटे,यांचे सह सूर्यतेज संस्था सदस्य व कलाशिक्षक, विद्या प्रबोधिनी शाळा यांचे सहकार्य लाभले आहे.
#जय_शिवराय...
#शिवसंदेश...
#वसुंधरा_दिवस...
#जय_हिंद...
#सूर्यतेज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत