आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या केसापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकी...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या केसापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सुदाम टाकसाळ, विनायक टाकसाळ, राधाकृष्ण टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे अध्यक्ष दतात्रय शिंदे, उपाध्यक्ष मछिंद्र पवार, निवृती भगत, सुनिल टाकसाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी जनसेवा मंडळाचे सर्व १२ उमेदवार विजयी झाले होते.
नुकतीच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड पार पडली. त्यावेळी अध्यक्षपदी राजेंद्र दशरथ खैरे तर उपाध्यक्षपदी मधुकर अंकूश रणदिवे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष पदाची सुचना ज्येष्ठ संचालक गुलाबराव डोखे यांनी मांडली असता अनुमोदन मारुती टाकसाळ यांनी दिले. तर उपाध्यक्ष पदाची सुचना ललित टाकसाळ यांनी मांडली. त्यास बाळकृष्ण मेहेत्रे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एक-एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आगले यांनी बिनविरोध निवडूण आल्याचे घोषित केले.
निवडीनंतर विनायक टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित संचालक माजी सरपंच गुलाबराव डोखे यांनी सभासदांनी टाकलेल्या विश्वासास सार्थ ठरवून संस्थेची ईमारत दुरुस्ती, तार कंपाऊंड दुरुस्ती तसेच स्वस्त धान्य दुकनाच्या समस्या सोडवून जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना संस्थेचे सभासद करून सर्वांना समान न्याय देवून संस्थेची प्रगती करू असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष खैरे व उपाध्यक्ष रणदिवे यांनी स्वाभिमानी जनसेवा मंडळाचे, मंडळाच्या नेत्यांचे, सभासदांचे व विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी चंद्रकांत टाकसाळ यांनी प्रास्ताविक केले तर माजी उपसरपंच व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस दिपक पवार यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत