शिरसगाव शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिरसगाव शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न

श्रीरामपूर/वेबटीम:- शिरसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा तावरणात चिमुकल्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. २०१९ ...

श्रीरामपूर/वेबटीम:-



शिरसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा तावरणात चिमुकल्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. २०१९  पासून कोरोना महामारीचा सर्वच घटकावर परिणाम झाला. लहान मुलांनाही या जागतिक महामारिणे बंदिस्त करून टाकले होते. याचा सर्वस्वी परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झाला. काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवत घेता आलेला नाही. या मुलांची व्यवस्थितपणे शाळा पूर्वतयारी होणे आवश्यक आहे. ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत. यासाठी एप्रिल, मे आणि जूनमध्ये शाळा पूर्वतयारी अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर चालवले जात आहे.

     या अभियानाचा एक भाग म्हणून शिरसगावमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिरसगावचे लोकनियुक्त सरपंच आबासाहेब गवारे, प्रवीण गवारे, जगदीश गवारे, गणेश गवारे, दिनेश गवारे, किशोर बकाल, आरिफ शेख, बाळासाहेब यादव यांच्यासह अनेक ग्रामस्थ,  पालक विद्यार्थ्यांसह उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पंडित,  श्रीमती क्षीरसागर, श्रीमती देशमुख, श्रीमती कांबळे, श्रीमती कदम, उपशिक्षक योगेश राणे, अंगणवाडी सेविका मंदा यादव, श्रीमती गायकवाड, श्रीमती जगताप यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला उपस्थितांचे योगेश राणे यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत