✨प्रवास अण्णांच्या व्यक्तिमत्वाचा✨ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

✨प्रवास अण्णांच्या व्यक्तिमत्वाचा✨

जन्म घेणारे एक ना एक दिवस मरतात कुणीही ह्या पृथ्वीवर कायमचा राहण्यास आलेला नाही. आपण सगळे पृथ्वीवरील पाहुणेच...!!!  आयुष्य जगत असताने अश्या ...




जन्म घेणारे एक ना एक दिवस मरतात कुणीही ह्या पृथ्वीवर कायमचा राहण्यास आलेला नाही. आपण सगळे पृथ्वीवरील पाहुणेच...!!! 


आयुष्य जगत असताने अश्या काही व्यक्ती आपल्यानं दिसतात की ,त्या  समाजासाठी कार्य करतात त्याचा मोबदला न घेता. लोकांचे सुख- दुःख वाटून घेतात त्यांच्यासाठी अविरतपणे काम करतात. अश्या व्यक्ती कधी मरत नाही त्या कायम अमर राहतात.


असेच एक राहुरी तालुक्यातील कणगर गावातील रहीवासी जगन्नाथ  धोंडीराम जाधव. उभं आयुष्य त्यांनी लोकांची मदत केली.


 त्याच्या बद्दल ऐकून मला कवी विंदा करवंदीकर यांची एक कविता आठवली,


करून जावे असेही काही,

दुनियेतुन या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या, 

निरोप शेवट देताना

स्वर कठोर त्या काळाचाही, 

क्षणभर व्हावा कातर कातर

नजर रोखून नजरेमध्ये, 

आयुष्याला द्यावे उत्तर


ह्या कवितेप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्त्व...!!!


अध्यात्मिकतेची आवड असणारे जगन्नाथ  कधी अण्णा बनून गेले कळालेच नाही.


त्यांनी अनेक लोकांना आपल्या कलेसाठी व्यासपीठ उभे करून दिले.

आण्णाला गायनाची आवड लहानपणापासून लागली होती

त्यांनी संगित, नाटक, भजन आदी क्षेञात अनेकांना घडवले.प्रसिद्धी पासुन वंचित कलाकारांना व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याची त्यांची कायम धडपड राहायची. कलाकारांना प्रसिद्धी मिळण्यास सुरवात झाली की, आण्णाला  समाधान वाटायचे. आपण कुणाच्या तरी कामाला येतोय ह्याच सुख त्यांना आणखी सामाजिक काम करण्यास प्रोत्साहित करायच.  दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य कस फुलवायच हे आण्णाला माहीत होतं.


अण्णा यांचा जन्म 1 सप्टेंबर 1962 रोजी झाला त्यांचे वडील राहुरी कारखान्यात कामाला होते.आर्थिक स्थिती तशी बेताची असल्या कारणाने देवाआधी बापाला महत्व देणारे आण्णा वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत कारखान्यात नोकरीस लागले.


 त्यांनी वाचमॅनची नोकरी केली.

वाचमॅन ते सुरक्षा अधिकारी हा प्रवास कठीण होता ...पण म्हणतात ना, चंदनाच्या झाडाला कितीहि मोठ्या विषारी सापाने विळखा घातला तरी त्याचा सुगंध जात नाही तसेच  आण्णाही...!!!!


सुरक्षा रक्षकाबरोबर अग्निशमन दलातही त्यांची चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या कामगिरीच्या जिवावर अग्निशमन विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. कामाच्या प्रामाणिकेतेच्या जोरावर गंगामाई शुगर, मुक्तेश्वर साखर कारखान्यात सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहिले. होमगार्डचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले. बुरुडगाव देवीचे, कोपरगाव येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम येथे  अनेक वेळा बंदोबस्त करून सेवा केली.


आयुष्याच्या वाटेवर आपल्याना  कुणाची तरी साथ हवी असते. कितीही संकटे येऊ पण आपला हात घट्टपणे पकडणार कुणीतरी पाहीजे, 

5 जुलै 1983 रोजी अण्णांचा विवाह देवयानी सोबत झाला.

 आयुष्याच्या प्रत्येक सुख-दुःखात नवऱ्याच्या पाठीमागे कणखरपणे उभा राहून संसाराचा गाडा हाकला.

पुढे जाऊन त्यांना तीन मुले झाले.

आपले मुलं आपल्यासारखे घडावे म्हणून लहानपणापासूनच त्यांना संस्कार दिले, शिस्त लावली. 

आपले प्रापंचिक कर्तव्ये पार पाडत त्यांनी सामाजिक कामेही हाती घेतली.


नोकरी करताना सामाजिक जीवनात त्यांनी पतितपावन संघटना स्थापन केली.

शिवनेरी वरुन शिवज्योत आणून शिवजयंती साजरी करण्याची प्रथा त्यांनीच पाडली आहे.

राहुरी साखर कारखान्याच्या सरगम म्युझिकल नाईटची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.


आयुष्याच्या वाटेवरती गुरुचे खूप मोठे स्थान असते. ज्याच्या आयुष्यात गुरू नाही त्याच आयुष्य निष्फळ गेले असे समजावे. गुरू म्हणजे आपल्या जीवनातील अंधकार मिटवणारा दिवा. आई-वडिलानंतर आपल्या जीवनात गुरूच खुप मोठं महत्व आहे.

अण्णा  कोकमठाण येथील ओम गुरुदेवचे निस्सिम भक्त होते. दर गुरुपैर्णिमेला ओम गुरुदेव आश्रमात संरक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायचे कारखान्याचे सुरक्षा रक्षक व होमगार्ड यांना घेवून भक्ताच्या सुरेक्षतेची विना मोबदला काळजी घ्यायचे. 



कल्याण महाराज काळे, भजनसम्राट बाळासाहेब वाईकर, भारुड कलाकार हमिद सय्यद, प्रति सुरेश वाडकर तान्हाजी जाधव (भाळवणी), तबलावादक शेखर दरवडे, गायक संतोष कुलट, शिवचरित्रकार हसन सय्यद (राहुरी फॅक्टरी) आदींना व्यासपिठ निर्माण करुन देवून प्रसिद्धीस आणले आहे. देवापर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताचे स्मरण, भजन , कीर्तन.


अण्णांनी स्थानिक भजनी मंडळ यांना शास्ञीय शिकविण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला त्यातुन अनेक गायक, नाट्य क्षेत्रातील कलाकार घडवले आहेत.

सुरक्षा अधिकारी प्रताप भोसले, स्व. सुभाष धुमाळ, दिलीप चव्हाण, श्री. गाडेकर, श्री.पवार यासह अनेकांसमवेत काम करताना अधिकारी घडविण्याचे व कायम साथ देण्याचे काम त्यांनी केले. 


अण्णां कायम एक म्हण म्हणायचे, असतील शित तर जमतील भुत या म्हणी प्रमाणे स्वतः शिस्त प्रिय असल्याने कोणापुढे झुकणे हा त्यांच्या शिस्तित बसत नव्हते. 


 कारखाना पगार वेळेवर होत नव्हते.

 बेताची परिस्थिती असतानाही दोन्ही मुलांबरोबर मुलीलाही पदवी पर्यंत शिक्षण दिले.

आयुष्यात एवढे काटे असूनही अण्णां मात्र गुलाबाच्या फुलासारखे कायमच टवटवीत राहायचे.


जशी त्यांची वाणी गोड  तस त्यांचं मन ही निर्मळ होत. कुणाचाही त्यांनी द्वेष केला नाही. घरातील मोठा मुलगा म्हणल्यावर अण्णांच्या अंगावर जबाबदारीचे ओझे लवकर पडले. आपल्या लहान भावांना त्यांनी शिक्षण घेण्यास लावले.


अण्णांचे वडील धोंडीराम जाधव हे ७५ वर्षेचे. त्यांची मनोभावे सेवा अण्णांनी केली. म्हणतात ना एकावेळी पंढरीच्या विठुरायाची पूजा नका  करू पण आपल्या आई-वडिलांची करा. बाप हा आपल्या आयुष्यातला मोलाचा दागिना आहे त्याला जपा. ह्या तत्वावर चालणारे अण्णा होते.



अहमदनगर आकाशवाणी, मुंबई दूरदर्शन,  ई टिव्ही, झी टॉकीज भजन स्पर्धा चॅनेलवर भजनाचे कार्यक्रमात ते सहभागी असायचे. टिव्ही 9 मराठीवरील शिवजयंती पोवाडा कार्यक्रमात शिवशाहीर विजय महाराज तनपुरे, कल्याण महाराज काळे  तर दूरदर्शनवरील भक्तीरंग भारुडसम्राट हमीद सय्यद यांच्या समवेत कार्यक्रमात सहभागी असायचे. पुणे येथील अंध अपंग यांना एकञित करुन त्यांचा  ग्रुप तयार करुन त्यांच्यातील कलाकारांना व्यासपिठ उपलब्ध करुन दिले. त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन व येण्या-जाण्याची व्यवस्था स्वतः पाहत होते. अंध अपंग यांनी सादर केलेल्या कार्यक्रमास मानधन उपलब्ध करुन देत असत. अध्यात्मिक क्षेञात त्यांची सलगी आसल्याने राज्यातील अनेक किर्तनकार, गायनाचार्य, तबलावादक, मृदंगचार्य यांच्याशी दांडगा संपर्क होता.


       ते नेहमी म्हणायचे ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान. आपण केलेल्या कामाचे मूल्यमापन योग्य वेळी होतच असते.

त्यांचा भगवंतावर दृढ विश्वास होता.


 कारखान्यात 40 ते 45 त्यांनी सिझनल परमनंट म्हणून नोकरी केली.


कोविडमुळे  वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी  अखेरचा श्वास घेतला.

पुन्हा एक खऱ्या जीवनातील नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेला. खूप सगळ्या आठवणी, शिकवण देऊन.


मरावं पण किर्तीरूपे उरावे..!!!

तस अण्णांंच आयुष्य✨


आध्यात्मिक व कला क्षेत्रातील हिरा हरपूण एक वर्ष पूर्ण झालंय   तरी त्यांच्या आठवणी ह्या मना-मनात कोरल्या गेल्या आहेत.



लेखिका- मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत