राहुरी/वेबटीम:- निळवंडे धरणाच्या पाण्याचा प्रत्यक्ष लाभ आगामी एक वर्षात देण्याचा प्रयत्न असून येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत राहुरी तालु...
राहुरी/वेबटीम:-
निळवंडे धरणाच्या पाण्याचा प्रत्यक्ष लाभ आगामी एक वर्षात देण्याचा प्रयत्न असून येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत राहुरी तालुक्यातील जिरायत भागाला वरदान ठरलेला निळवंडेचा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आज सोमवारी मंत्री तनपुरे यांनी निळवंडे धरणाच्या कामाची पाहणी केली राहुरी तालुक्यातील जिरायत भागाला लवकरात लवकर धरणाचे पाणी देण्यासाठी आपण कटिबद्ध असून या प्रकल्पाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भरभरून सुमारे 900 कोटी रुपयाचा निधी आजपर्यंत उपलब्ध करून दिला असल्याने प्रकल्पाचे काम वेगाने होत गती पकडली आहे त्याच बळावर आगामी एक वर्षात पाणी देण्याचा मानस आहे मागील भारतीय जनता पक्षाच्या काळात गेल्या पाच वर्षात 377 कोटी रुपयांचा निधी मिळाला महा विकास आघाडी सरकारच्या काळात कोरोणा सारखे महामारीचे संकट असतानाही निळवंडे प्रकल्पाला गेल्या तीन वर्षात सुमारे 900 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला अनेक विकास कामांना कात्री लागलेली असतानाही निळवंडे प्रकल्पाला मात्र प्राधान्याने निधी मिळाला आहे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनीही या प्रकल्पासाठी मोठे योगदान दिले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका व येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रसाद तनपुरे यांनी आटोकाट प्रयत्न केले निळवंडे प्रकल्पातील 52 कामांपैकी सुमारे 50 कामे पूर्ण झाली आहेत उर्वरित दोन कामेही अडथळे पार करून पूर्ण केली जाणार आहे कानडगाव निंभेरे या भागातील कालव्याची कामांना वनखात्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला खात्याच्या संबंधित अधिकारी वर्गांची बैठक घेऊन मार्ग काढला जात आहे प्रकल्पातील बोगद्याचे काम येत्या 20 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदार कंपनीने दिले आहे त्यामुळे प्रकल्पाने अधिक गती पकडण्याच्या स्थितीत आहे दर प्रत्येक महिन्याला प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला जाणार असून मंत्रालय स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविल्या जात आहेत या कामी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मोठी मदत होत आहे माजी लोकप्रतिनिधींनी खोटे आश्वासन देऊन बोळवण केली होती मी मात्र तसे न करता वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना माहिती देत आहे खोटे आश्वासन न देता प्रत्यक्ष कामावर आपला भर असल्याचे स्पष्ट केले आर्थिक संकटाच्या काळातही निळवंडे प्रकल्पाला निधी मिळाल्याने अधिक सुलभता आली महसूल प्रशासन जलसंपदा विभाग वनविभाग अशा तीनही शासकीय खात्यांचा ताळमेळ घालत बैठका घेऊन मार्ग काढला जात आहे कालव्याच्या कामात येणाऱ्या रस्ते ओलांडण्यासाठी पुलांची निर्मिती करण्यात आली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कामे होत असल्याने अधिक समाधान लाभत असल्याचे स्पष्ट केले अधीक्षक अभियंता अरुण नाईक कार्यकारी अभियंता प्रमोद माने सहाय्यक अभियंता असिफ शेख जिल्हा उप वनसंरक्षक सुवर्णा माने नायब तहसीलदार माधुरी आंधळे पुनम दंडिले या अधिकार्यांची एकत्रित बैठक जागेवरच घेण्यात आली व येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला यावेळी ज्ञानदेव सिनारे राजेंद्र सिनारे गोरख हारदे भिमराज हारदे सुभाष डुक्रे अमोल भनगडे बापु कोबरणे सुयोग नालकर सुजित वाबळे अनिल घाडगे दीपक वाबळे ,डॉ रवींद्र गागरे, सोपानराव हिरगळ सर, पाटीलसाहेब गागरे,जावेद सय्यद, मछिंद्र गागरे, हरिभाऊ लोंढे, हमीद शेख, सुदाम संसारे,पांडुरंग लोंढे, प्रकाश घोरपडे, प्रभाकर धोंडे, भाऊराव गागरे, रफिक सय्यद, रखमभाऊ घोरपडे, रामकिसन गागरे, सावळेराम गागरे,संजय मुसमाडे, भगवान गागरे,यासह कानडगाव निंभेरे या जिरायत भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत