सात्रळ/वेबटीम:- पंचक्रोशीतील व्यापारी महत्व असलेल्या सोनगाव पेठेतील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे कामाची सुरवात झाली आहे. राज्याचे...
सात्रळ/वेबटीम:-
पंचक्रोशीतील व्यापारी महत्व असलेल्या सोनगाव पेठेतील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे कामाची सुरवात झाली आहे. राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्तदादा तनपुरे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून या रस्त्याच्या कामासाठी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असून पेठेतील व्यापारी, नागरिक तसेच ग्रामस्थानी या बद्दल ना. प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहेत. सोनगाव पेठेतील हार्दिक रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाची ग्रामस्थांची अनेक दिवसा पासून मागणी होती, रस्तावरील उघडी पडलेली खडी, धूळ या मुळे नागरिक , व्यापारी त्रस्त होते.
रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण होणार असल्याने नागरिक आनंदी झाल्याचे चित्र दिसत असून रस्त्याचे काम योग्य व चांगल्या प्रतवारीचे करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस चे ओ बी सी सेल चे प्रदेश चिटणीस मिलिंद अनाप, राष्ट्रवादीकाँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष सूर्यभान शिंदे, तसेच सोनगावचे उपसरपंच किरण अंत्रे यांनी या वेळी केले. रस्त्याच्या मजबुतीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी अय्याज तांबोळी,गोविंद असावा, सतीश गांधी अन्सार तांबोळी तसेच पेठेतील व्यापारी वर्ग, ग्रामस्थ उपस्तिथ होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत