प्रेरणा पतसंस्था सहकार चळवळीचा आदर्श- आ.लंके - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रेरणा पतसंस्था सहकार चळवळीचा आदर्श- आ.लंके

  राहुरी(वेबटीम) प्रेरणा पतसंस्थेमुळे ग्रामीण भागाचा अर्थकारण बदलून गेले असून सर्वसामान्यांना अर्थपुरवठा झाल्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर उंचा...

 राहुरी(वेबटीम)



प्रेरणा पतसंस्थेमुळे ग्रामीण भागाचा अर्थकारण बदलून गेले असून सर्वसामान्यांना अर्थपुरवठा झाल्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला गेला आहे. हजारो युवकांना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य केल्यामुळे स्वतःच्या पायावर उभी राहिले त्यांचे छोट्या मोठ्या उद्योगांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत झाली . ज्येष्ठ नेते माजी प्रसाद तनपुरे  यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणा पतसंस्था चांगल्या प्रकारे काम करीत असल्याने ही संस्था चळवळीचा आदर्श असल्याचे प्रतिपादन पारनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.निलेश लंके यांनी केले.



गुहा येथे प्रेरणा पतसंस्थेस आमदार निलेश लंके यांनी भेट दिली प्रसंगी ते बोलत होते .


पुढे बोलताना आ.निलेश लंके म्हणाले की, प्रेरणा पतसंस्थेच्या पारदर्शी कारभारामुळे संस्थेचा राज्यभर नावलौकिक आहे. सामाजिक क्षेत्रातही संस्थेचे भरिव कार्य असल्याचे आ.लंके म्हणाले.


यावेळी प्रेरणा संस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांनी आ. निलेश लंके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


यावेळी संचालक मच्छिंद्र हुरुळे, अशोक उर्हे प्रा. लांबे सर, सुजित वाबळे ,सिद्धार्थ वाबळे त्याचप्रमाणे  अविनाश ओहोळ,अनिल आंबेकर, शौकत भाई सय्यद, रविंद्र दोंडे, प्रा. विशाल वाबळे, सुभाष कोळसे, बंडू कोळसे, संजय गांडुळे, सागर सोनवणे ,श्रीहरी आंबेकर, प्रशांत वाबळे, डॉ. विजय वाबळे, विजय सोनवणे, निलेश ओहोळ, शिवाजी  मांजरे ,बाळासाहेब कोळसे, बंटी वाबळे, अतुल कोळसे,रविंद्र उर्हे,गंगाराम चंद्रे,योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत