देवळाली प्रवरा/वेबटिम:- येथील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारे हजरत शहा दावल मालिक बाबा यांचा उरूस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उरूस...
देवळाली प्रवरा/वेबटिम:-
येथील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारे हजरत शहा दावल मालिक बाबा यांचा उरूस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
उरूस निमित्त विविध तरुण मंडळे, धर्मगुरू ,समाजसेवक उद्योजक ,डॉकटर्स,विधी तज्ञ व भाविक भक्तां च्या वतीने व साक्षीने अजमेर राजस्थान इथून आणलेली पवित्र चादर अर्पण करण्यात आली.
माजी खासदार प्रसाद तनपुरे, साई संस्थांनच्या सदस्या अनुराधा आदिक,डी वाय एस पी संदीप मिटके,जेष्ठ नेते आसाराम ढुस,अजित कदम,माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,चैतन्य उद्योग चे अध्यक्ष गणेश भांड,साई आदर्श चे चेअरमन शिवाजी कपाळे आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सुरेश निमसे,अरुण ढुस,नगरसेवक राजेंद्र पवार, उद्योजक राजेंद्र देशमुख, कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे आदी मान्यवरच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली.
पत्रकार रफीकभाई शेख यांनी उपस्थितांचे स्वागत करून दर्गा प्रमुख अकिलबाबा पटेल यांच्या कार्याची व महतीची माहिती विशद केली.
दर्गा परिसरात लंगर,भंडारा महाप्रसादाचे आयोजन तसेच प्रसिद्ध कव्वाल युसूफ शोला यांच्या शानदार कव्वाली चा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.
याप्रसंगी संगमनेर येथील संपूर्ण कुटुंबाचे देहदान संकल्प करणारे आदित्य दीपकराव घाडगे,नगर येथील उद्योजक जितेंद्र अशोक तोरणे,कर्नल बशीर जमाल सय्यद,गनिभाई बागवान,मुसाभाई शेख, पत्रकार रफीकभाई शेख तसेच नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे बाबुराव गवळी यांना मौलाना आझाद प्रतिष्ठान तर्फे समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हजरत शहा दावल मालिक खादिम कमिटी,व्यवस्थापन समिती, मौलाना आजाद सेवा प्रतिष्ठान,कृषी बाबा प्रोडूसर कंपनी, तसेच आकिलबाबा व अब्बास भाई पटेल परिवार, खादीम कमिटीचे सदस्य सर्वश्री मुरलीधर तांबे सर, बाळासाहेब जोशी,शरद टेकावडे, आप्पासाहेब शेळके, जान महंमद इनामदार, नवनाथ क्षीरसागर,डॉ. प्रशांत नालकर ,रशीद सय्यद ,रवींद्र पेरणे, जावेद तांबोळी, रमेश गाडे, आशिष ढेरे, सचिन नालकर ,जावेद शेख आदीनी विशेष परिश्रम घेतले.
शिवचरित्रकार हसन सय्यद व समीर माळवे यांनी सूत्रसंचालन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत