दैनिक सार्वमंथनचे पत्रकार व तहसील ऑफिसला खबर का देतो असे म्हणून - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दैनिक सार्वमंथनचे पत्रकार व तहसील ऑफिसला खबर का देतो असे म्हणून

  राहुरी(वेबटीम):- दैनिक सार्वमंथनचे पत्रकार व तहसील ऑफिसला आमच्या गाडीच्या खबर का देतो असे म्हणून राहुरी तालुक्यातील वळण येथील एकास मारहाण ...

 राहुरी(वेबटीम):-


दैनिक सार्वमंथनचे पत्रकार व तहसील ऑफिसला आमच्या गाडीच्या खबर का देतो असे म्हणून राहुरी तालुक्यातील वळण येथील एकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वळण येथील अरुण नामदेव चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 7 मे रोजी सायंकाळी मी व माझी पत्नी मनीषा घरासमोर उभा असताना जगन्नाथ गुलाब जाधव राहणार पिंपरी वळण व एक अनोळखी इसम यांनी तू आमच्या गाडीच्या सार्वमंथन यांचे पत्रकार व तहसीलला खबरी का देतो असे म्हणून हातातील लाकडी दांड्याने माझ्या पाठीवर मांडीवर मारहाण केली व त्याच वेळी माझी पत्नी ही मला सोडवासोडव करण्यासाठी आले असता तिला ही धक्काबुक्की केली.

तू जर आमच्या गाडीची खबर दिली व पोलिसात तक्रार केली तर तुला व तुझ्या घरच्यांची तुकडे करून जिवे मारून टाकू अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.


दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अरुण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगन्नाथ गुलाब जाधव (रा.पिंपरी वळण, ता. राहुरी) व एका अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 324 323 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश भवार करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत