राहुरी(वेबटीम) महाराष्ट्र दिन १ मे रोजी राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक येथील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन...
राहुरी(वेबटीम)
महाराष्ट्र दिन १ मे रोजी राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक येथील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन अंत्यत धावपळीत पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक दराडे यांची शरीरयष्टी व विद्यार्थीप्रिय भाव पाहून विद्यार्थ्यांत काही बदल दिसून आले आहेत.
पोलीस निरीक्षक दराडे आल्यापासून तर परत जाण्यापर्यंत पुर्ण निरिक्षण विद्यार्थ्यांनी केले., पिळदार शरीर, डौलदार चाल, चेह-यावरील स्मित हास्य आणि विद्यार्थीप्रिय स्वभाव हे मुलांच्या हृदयाला स्पर्शून गेले.
दराडे साहेबांची छाती बसल्यावर पण फुगलेली ,उभे राहिल्यावर पण फुगलेली आणि चालताही फुगलेली .....मला दराडे साहेबांसारखेच साहेब व्हायचे.... असे म्हणून रुद्रा सदाशिव तारडे इयता पहिलीच्या विद्यार्थ्यांने म्हणून न आवडणारे दूध दररोज पिण्यास प्रारंभ केला आणि छोटे व्यायाम करायलाही सुरुवात केली. आज शाळेत शालेय पोषण आहार घेण्यासाठी रुद्रा या चिमुकल्याची आई आली असता मोठ्या आनंदाने शाळेत येऊन शिक्षकांना सांगितले.
अनेक मुलांनी पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन आपला जीवनक्रमही बदलला. प्रमुख पाहुण्यांचा माझ्या विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला व स्नेहसंमेलन घेण्यामागील उद्देश सफल झाल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र उदमले यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत