देवळाली प्रवरात अल्पवयीन मुलास मारहाण करून बळजबरीने गाडीत बसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात अल्पवयीन मुलास मारहाण करून बळजबरीने गाडीत बसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी

राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलास विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बळजबरीने गाडीत बसवून नेऊन जीवे मा...

राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलास विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बळजबरीने गाडीत बसवून नेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ४ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 याबाबत १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हंटले की, माझा मुलगा ४ मे रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास औषधोपचारासाठी राहुरी येथील लाटे हाँस्पीटल येथे जात असताना बालु कल्हापुरे याने त्याच्या चॉकलेटी रंगाच्या स्विफट कार मध्ये त्याच्या सोबत इतर तिघांनी येऊन विनाकारण लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्याला बळजबरीने गाडीत बसवुन त्याला खंडोबा मंदीर देवळाली प्रवरा येथे नेऊन  मारहाण  केली. यातील एकाने तू माझ्या चुलत भावाच्या मुलीकडे कडे का पाहतो असे म्हणुन लाथाबुक्याने मारहाण करुन दमदाटी करुन तु जर झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवे ठास मारुन टाकु धमकी देऊन देवळाली पोलीस स्टेशन येथे घेवुन गेले.


 सदर अल्पवयीन मुलगा व त्याचे वडील घाबरलेले व भयभीत झाले असल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून बालू कल्हापुरे,  अमोल विलास मुसमाडे,  सागर गडाख, आकाश गडाख (सर्व देवळाली प्रवरा ता राहुरी) यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भा.द.वि 363 , 323 , 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल एन.एल.भिताडे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत