राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- 1 व 2 जून रोजी दिल्ली येथे होणाऱ्या महिलांच्या आशियाई शुटींग बॉल स्पर्धेमध्ये राहुरी फॅक्टरी येथील कु दिव्या राजेंद्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
1 व 2 जून रोजी दिल्ली येथे होणाऱ्या महिलांच्या आशियाई शुटींग बॉल स्पर्धेमध्ये राहुरी फॅक्टरी येथील कु दिव्या राजेंद्र पुजारी हिचा भारतीय महिला शुटींग बॉल च्या संघाच्या कर्णधार पदी निवड झाल्याबद्दल वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी महिला आघाडी च्या वतीने सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत भारत,पाकिस्तान,नेपाळ,श्रीलंका,
बांग्लादेश इत्यादी देशातील संघ सामील होणार आहे
ग्रामीण भागातील महिलाही क्रीडा क्षेत्रात कुठे कमी नाही हे आज दिव्याने दाखवून दिले असे यावेळी बोलताना प्रीतिताई कदम म्हणाल्या
सूत्रसंचालन भाजप शहराध्यक्ष व वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान चे संस्थापक वसंत कदम यांनी केले
यावेळी प्रीतिताई कदम,क्रीडा परीक्षक राजेंद्र पुजारी,आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, हिंदू राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय गागरे,अरुण पठारे,जालिंदर दोंड,धनंजय थोरात,राजुभाई शेख तसेच मनीषा पोटे, शीतल दोंड,कविता मोरे,मीना कदम,ज्योती गागरे,वनिता कदम,पूनम कुटे,सोनाली कदम,सविता कदम,कु प्रीती कदम,श्रुतिका दोंड,पुजारी ताई इत्यादी महिला उपस्थित होत्या
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन मोरे,महेंद्र दोंड, वैभव कदम,प्रसाद कदम,राकेश बोरसे,आदिनाथ कुटे,सुयोग सीनारे,अमोल वाळुंज,ललित काळे,ऋषिकेश थोरात,अक्षय पेरणे इत्यादी सभासद प्रयत्नशील होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत