सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, यश निश्चित – ना. आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, यश निश्चित – ना. आशुतोष काळे

कोळपेवाडी/वेबटीम:- कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावून शहरविकासासाठी १८ कोटी रुपये निधी दिला आहे. त्या माध्यमातून कोपरगाव शहरात मोठ्या प...

कोळपेवाडी/वेबटीम:-


कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावून शहरविकासासाठी १८ कोटी रुपये निधी दिला आहे. त्या माध्यमातून कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. यापुढील काळात देखील महाविकास आघाडी सरकारकडून शहरविकासाला निधी कमी पडू देणार नाही मात्र आलेला निधी खर्च होणे गरजेचे आहे. त्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. यश निश्चित मिळणार असल्याचा विश्वास श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.


कोपरगाव शहरातील समतानगर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अक्षय पवार, शाहरुख पठाण, दिपक चव्हाण, पवन भालेराव, दिपक दवंगे, गणेश खरात, प्रवीण पवार,मंगेश मेहेरखांब, विशाल बनकर, मंगेश जाधव, विलास अभंग, किरण सोळसे, फिरोज पठाण, योगेश कुहिरे, अमोल पवार, शिवाजी खरात, तौफिक शेख, गौतम जाधव, प्रमोद आढाव, गणेश सोनवणे, विशाल चव्हाण, अजीज पठाण आदी कार्यकर्त्यांनी  ना. आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.


यावेळी समतानगर राष्ट्रवादी महिला काँग्रेस शाखेच्या मार्गदर्शिका, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, शाखाध्यक्षा पूनम पाटोळे, उपाध्यक्षा बेबी वाकचौरे, संघटक अर्चना खैरनार, सचिव निता पाटोळे, समतानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाखा मार्गदर्शक शैलेश साबळे, शाखाध्यक्ष विलास पाटोळे, सिताराम पंडोरे, सचिव कैलास जाधव, संघटक रामभाऊ गुंजाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कार्तिक सरदार, रमेश गवळी, कृष्णा आढाव, मायादेवी खरे, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, संदीप कपिले, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले, संतोष चवंडके, आकाश डागा, नितीन शिंदे, राजेंद्रजी आभाळे, सचिन गवारे, ऋषीकेश खैरनार, एकनाथ गंगूले, राजेंद्र जोशी, प्रताप गोसावी, नितीन साबळे, संदीप सावतडकर, विशाल निकम, रवींद्र राऊत, गणेश बोरुडे, सोमनाथ आढाव, शुभम लासुरे, विकी जोशी, दिनेश पवार, विलास आव्हाड, पप्पु गोसावी, तेजस  साबळे, ऋतुराज काळे, मयूर  पारधी, आकाश  गायकवाड, बाळू  गोर्डे, तुषार साठे, निलेश रुईकर, संतोष पवार, अमोल गिरमे, मयूर वीर, गजानन वाणी, योगेश वाणी, सचिन बोरावके, किरण बागुल, सागर महाजन, राजेश मोटे, साजिद शेख, दिक्षा उनवणे, भाग्यश्री बोरुडे, मिरा साळवे, उषा उदावंत, चंद्रभागा हिंगे, भामा खंडीझोड, ऋता पाटोळे, सुमन पाटोळे, सलीमा शेख, यास्मिन पठाण, मंगल पंडोरे, कमल त्रिभुवन, नसीम शाद, पद्मा परभार, शितल म्हस्के, सविता आहिरे, राणी कांबळे, शकीला सय्यद, अमिना सय्यद, नेहा टिके, दीपाली सोळसे, रुपा पाटोळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत