राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तथा देवळाली प्रवरा दुरक्षेत्र येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक सागर गंगाधर माळी(वय-३२) यांचे न...
राहुरी(वेबटीम)
राहुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तथा देवळाली प्रवरा दुरक्षेत्र येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक सागर गंगाधर माळी(वय-३२) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
मूळचे नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील रहिवासी असलेले पोलीस नाईक सागर माळी हे गेल्या ५ ते ६ दिवसापासून आजारी असल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांच्या मृत्यू झाला आहे. पोलीस नाईक माळी यांनी यापूर्वी शिर्डी साई मंदिर, अकोले पोलीस स्टेशन येथे सेवा केली असून सध्या देवळाली प्रवरात पोलीस नाईक या पदावर काम करत होते.
आज पहाटे माळी यांच्या निधनाने वृत्त समजताच पोलीस बांधवांनी हळहळ व्यक्त केली. मयत सागर माळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील भाऊ असा परिवार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, मधुकर शिंदे, सज्जन नारहेडा व पोलीस कर्मचाऱ्यांनी माळी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत