राहुरी(वेबटीम) देशात उद्या ३ मे रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सण साजरा होत असून राहुरी शहरात मुस्लिम समाज बांधव इदगाह मैदान येथे नमा...
राहुरी(वेबटीम)
देशात उद्या ३ मे रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सण साजरा होत असून राहुरी शहरात मुस्लिम समाज बांधव इदगाह मैदान येथे नमाज अदा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज २ मे रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सह पोलीस प्रशासनाने इदगाह मैदानाची पाहणी करून संपूर्ण शहरातून पोलीस वाहनातून पेट्रोलिंग केले.
यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह राज्य राखीव दलाची एक तुकडी तसेच
पोलीस हवालदार सोमनाथ जायभाय,पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे ,पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब रोहकले, पोलीस नाईक शिवाजी खरात आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले ' हे' आवाहन
कोणत्यहि जाती / धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो मजकूर सोशल मिडीयावर (फेसबूक, व्हॉटसअप, इंस्टाग्राम व ट्विटरवर) पोस्ट करू नये. अशाप्रकारच्या प्रकारचे कृत्यांवर पोलीसांची करडी नजर अशा व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, सामाजिक सलोखा राखण्यास सहकार्य करा.कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नका अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी म्हंटले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत