देवळाली प्रवरा सोसायटीच्या निवडणूकीसाठी १९ जूनला मतदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा सोसायटीच्या निवडणूकीसाठी १९ जूनला मतदान

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येत्या १९ जूनला राहुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा सोसायटीची पंचवार्षिक नि...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

येत्या १९ जूनला राहुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक होत असून निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी कंबर कसली आहे. भाजप तथा माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या गटातील काही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहे.मात्र दुसरीकडे विरोधी गटाची आघाडी साठी जुळवाजुळव सुरू असून याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी देवळाली प्रवरा बाजारतळावर परिवर्तन मेळावा घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेणार आहे.


देवळाली प्रवरा सोसायटीत भाजप तथा माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या अधिपत्याखाली संचालक मंडळाची सत्ता आहे.नुकताच देवळाली प्रवरा सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या १९ जूनला सोसायटीच्या १३ जागांसाठी मतदान होणार असून सत्ताधारी भाजपा सह विरोधी आघाडीने सोसायटी ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखण्यास सुरूवात केले आहे.

ज्याच्या ताब्यात सोसायटीची सत्ता त्याच्याकडेच नगरपालिकेची चावी असा इतिहास असल्याने सोसायटी मिळवण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी जोरदार पणे कंबर कसली आहे.

मागील तीन दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून सत्ताधारी भाजपणे यात आघाडी येत आपल्या काही उमेदवारांचे अर्ज देखील दाखल केले आहे.तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी आघाडीच्या नेत्यांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू असून याच पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा बाजारताळ येथे आज रविवारी सायंकाळी ६ वाजता  लोकसेवा आघाडीने परिवर्तन मेळावा घेऊन निवडणूकीचे रणशिंग फुंकणार आहे.

या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,शिवसेना,आरपीआय व इतर मित्र पक्षाचे स्थानिक नेते सभासदांना संबोधित करणार आहे.

एकंदरीत देवळाली सोसायटीच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सोसायटीची सत्ता कोणाच्या ताब्यात येणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.


*असा आहे देवळाली सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम*

👉🏻११ मे ते १८ मे उमेदवारी अर्ज दाखल 

👉🏻१९ मे  उमेदवारी अर्ज छाननी 

👉🏻२० मे वैध अर्जांची सूची प्रसिध्द करणे

👉🏻२० मे ते ०३ जून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालावधी

👉🏻०६ जून चिन्ह वाटप

👉🏻१९ जून मे मतदान व मतमोजणी


ह्या १३ जागांसाठी होणार निवडणूक


१) सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी - ०८

२) अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी - ०१

३) महिला प्रतिनिधी - २

४) इतर मागासवर्गीय प्रतिनिधी - १

५) भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग - १


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत