राहुरी(वेबटीम):- अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथील तरुण ऋषिकेश विठ्ठल डव्हाण अंगावर पेट्रोल टाकून जाळू...
राहुरी(वेबटीम):-
अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथील तरुण ऋषिकेश विठ्ठल डव्हाण अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. कोर्ट परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी आणि न्यायालयात बंदोबस्त करण्यास असलेल्या पोलिसांनी धावत वाचवले आहे. जखमी डव्हाण यास तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमी ऋषिकेश चव्हाण यांच्यावर गेल्या दोन दिवसापूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग गुन्हा दाखल करण्यात आला होता .दरम्यान त्याने आज जाळून स्वतःला जाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने नेहमी अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून का घेतले याबाबत मात्र माहिती भेटू शकली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत