राहुरी फॅक्टरीतील 'या' मुस्लिम कार्यकर्त्यास ' मनसे'च्या या नेत्याचा फोन! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील 'या' मुस्लिम कार्यकर्त्यास ' मनसे'च्या या नेत्याचा फोन!

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवचरित्रकार हसन सय्यद यांना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवचरित्रकार हसन सय्यद यांना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय बाळा नांदगावकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदवरील भोंगे लक्ष्य केल्याने अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मनसेतून बाहेर पडणे पसंत केले आहे. हे होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासु सहकारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्यातील काही मुस्लिम कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.


 आज राहुरी फॅक्टरी येथील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवचरित्रकार हसन सय्यद यांना स्वता: बाळ नांदगावकर यांनी फोन करून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत