राहुरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथील सुदाम मारुती गायकवाड यांच्या घराला रविवार १ मे रोजी दुपारी आग लागल्याने मोठे नुकसान झ...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथील सुदाम मारुती गायकवाड यांच्या घराला रविवार १ मे रोजी दुपारी आग लागल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना घडली.
प्रसादनगर भागातील रहिवाशी व वीटभट्टी मजूर सुदाम मारुती गायकवाड यांच्या घराला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे दिसताच बंटी लोंढे, गोरख नरोडे, अनिल पवार , शारदा मित्र मंडळाचे कार्यकर्त व स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले.
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या बंबाने आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. या आगेत गायकवाड यांच्या घरातील संसारपयोगी वस्तू, धान्य, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान देवळाली प्रवराचे तलाठी श्री.साळवे यांनी पंचनामा केला आहे.
दरम्यान अंत्यत गरीब कुटुंबातील गायकवाड यांच्या घराची अक्षरशः राखरांगोळी झाली असून हे कुटुंब रस्त्यावर आले आहे.समाजातील दानशूर मंडळींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत