सात्रळ/वेबटीम:- अतिशय महत्वाचा असलेला, दोन तालुक्यांना जोडणारा सात्रळ येथील गट ऑफिस चौक ते पाथरे चौक हा प्रवरा नदीवरून जाणारा रस्ता सध्या अत...
सात्रळ/वेबटीम:-
अतिशय महत्वाचा असलेला, दोन तालुक्यांना जोडणारा सात्रळ येथील गट ऑफिस चौक ते पाथरे चौक हा प्रवरा नदीवरून जाणारा रस्ता सध्या अतिशय दयनीय अवस्थेत आहे. याच रस्त्याने साखर कारखान्याची ऊस वाहतूक, नोकरदार, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी, ग्रामस्थ, वाहनधारक मोठ्या संख्येने प्रवास करतात.
रस्त्यात असलेले मोठमोठे खड्डे, उघडी पडलेली खडी, या कारणामुळे वाहनधारक त्रस्त झालेचे चित्र आढळून येत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी या रस्त्याच्या मजबुतीकरण, डांबरीकरण कामाचे मोठ्या डामडौलात स्थानिक पुढाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यानंतर या रस्ता कामासाठी दिलेल्या निधीबद्दल आभाराचे फ्लेक्स बोर्ड सुद्धा काही दिवस झळकत होते. सध्या या रस्त्याच्या कामाचे घोड कुठे अडले आहे याची चर्चा ग्रामस्थाकडून होत असून ह्या कामाचा पाठपुरावा तातडीने होणे गरजेचे आहे. अधिक चौकशी करता असे समजते की, मर्जीतील व्यक्तीला हे मजबुतीकरण डांबरीकरण काम दिलेले असून सदर कामाचा निधी अद्याप मिळाला नसल्याचे ठेकेदाराकडून ग्रामस्थांना माहिती दिल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. जर कामाचा निधीच नव्हता तर उद्घाटनाची घाई कशाला? असा प्रश्न सुज्ञ नागरिक करत आहेत.या रस्त्याच्या मजबुतीकरण,डांबरीकरन च्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना या कामातील दिरंगाई बाबत छेडले असता त्यांनी या विषयी मौन धारण केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत