सात्रळ/वेबटीम:- सात्रळ-रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापुजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ यांच्या सं...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ-रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापुजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ यांच्या संयुक्त विद्यमाने, कर्मवीर भाऊराव पाटील यांची मुष्टीफंड योजना रयत शैक्षणिक संकुल सात्रळच्या सर्व शिक्षकांनी सात्रळ परिसरात वाड्या-वस्त्यावर जाऊन घरोघरी रयत शिक्षण संस्थेची ध्येय-धोरणे पालक व ग्रामस्थांना समजावून सांगतात. तसेच सात्रळ शैक्षणिक संकुलातर्फे दोन विद्यार्थी वसतिगृहे चालविली जात आहे.
या वस्तीगृहात विद्यार्थी व विद्यार्थींना धान्य रुपाने सात्रळ परिसरात माळेवाडी,डुक्रेवाडी,तांभेरे रोड,कडूवस्ती, तांदुळनेर,अनापवाडी,चाहुरवस्ती या क्षेत्रातील बहुसंख्य शेतकरी वर्ग धान्य रूपाने तसेच रोख रकमेच्या स्वरूपात देणगी प्रदान करत असतात. ही परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालू आहे.
शाळेतील सर्व शिक्षक धान्य संकलनासाठी योग्य नियोजन करतात. व नियोजनानुसार सकाळी ७:३० ते ११ वाजेपर्यंत स्वत: दारोदार फिरून मिळेल ते धान्य व मिळेल ती रक्कम वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित करतात.
गेली दोन वर्ष ही योजना कोव्हिडमुळे खंडित झाली होती. यावर्षी ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
आज ही आपल्या घरी आलेल्या रयत सेवकांमध्ये पालकांना कर्मवीर भाऊराव पाटील दिसत आहे.
अशा बोलक्या प्रतिक्रिया पालकांमधून दिसून येतात.त्यामुळे शिक्षकांना मनापासून समाधान व अभिमान वाटत आहे.
संकुलाचे प्राचार्य अशोक वानखेडे, पर्यवेक्षक एस.जी.बिडगर यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलातील सर्व शिक्षक करत असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे रयत शिक्षण संस्थेचे,उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, स्कूल कमिटीचे अध्यक्ष व सदस्य, परिसरातील शिक्षणप्रेमी, मान्यवर आदिंनी या उपक्रमाचे भरुभरुन कौतुक केले.
हा उपक्रम राबविण्यासाठी विभागप्रमुख श्री.विलास गभाले,श्री.केशव मुसमाडे,श्री.सच्चिदानंद झावरे,श्री. सिराज मन्सुरी,श्री.युनुस पठाण,श्री.भारत कोहकडे,श्री.वैभव वसावे,श्री.संजय दिघे,श्री.सतिश नालकर, श्री.देविदास थोरात,श्री.सुदर्शन गिते,श्री.शिवदास सातपुते,श्री.त्रिंबक राशिनकर, प्रा.विलास दिघे,प्रा.पंकज दिघे,प्रा.आण्णासाहेब गोर्डे,प्रा.सतिश कदम,प्रा.विश्वास घुगे, प्रा.किशोर दातीर प्रा.असीर पठाण,प्रा.मोईन बागवान,प्रा.अजित कक्रांळे प्रा.प्रविण तांबे,श्री.जालिंदर बनगये,श्री.ज्ञानदेव माळी, रामदास साबळे आदिनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत