२० दुचाकी चोरांना शहर पोलिसांनी दुचाकीसह केले जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

२० दुचाकी चोरांना शहर पोलिसांनी दुचाकीसह केले जेरबंद

कोपरगाव प्रतिनिधी दि १९ मे २०२२ रोजी फिर्यादी नामे किशोर निवृत्ती दिघे वय २९ वर्षे धंदा नोकरी (पोस्ट मास्तर) रा. बेट संत जनार्धन आश्रम ता. क...

कोपरगाव प्रतिनिधी



दि १९ मे २०२२ रोजी फिर्यादी नामे किशोर निवृत्ती दिघे वय २९ वर्षे धंदा नोकरी (पोस्ट मास्तर) रा. बेट संत जनार्धन आश्रम ता. कोपरगाव यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोसा क्र. एम एच-१५ सीयु ९१८० हि दि. १३ मे २०२२ रोजीचे रात्री ०९:३० वा. दरम्यान त्यांचे राहते घरा समोर हँडल लॉक करून लावली होती ती दि. १४ मे २०२२ रोजीचे सकाळी ०८:३० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली होती त्यावरुन किशोर निवृत्ती दिघे  यांचे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु रजि नंबर १३६ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि १९ मे २०२२ रोजी ०१.४१ गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हयातील तपास घेणेकामी पोलीस निरीक्षक  वासुदेव देसले यांनी त्यांचे अधिपत्याखाली पोहेकॉ आर पी पुंड, पो कॉ जे पी तमनर, पो कॉ  संभाजी शिंदे, पो कॉ राम खारतोडे, पो कॉ  जी. व्ही. काकडे अशांचे एक पथक तयार करुन नाकाबंदी करीत असताना, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना  गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, गोविंद संजय शिंदे रा. बेट कोपरगाव याचेकडे चोरीची हिरो

होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल  असुन तो सध्या कोपरगाव ते शिर्डी जाणारे रोडवर बेट नाका कोपरगाव येथे थांबलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी मिळालेल्या महितीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता, मिळालेल्या माहीती प्रमाणे बेटनाका येथे एक ईसम मिळुन आला.

त्याचेकडील हिरो होंडा कंपनिची स्प्लेंडर प्लस मोसा क्र. एम एच-१५ सीयु. ९१८० हि मोटार सायकल होती. तेव्हा सदर इसमास  त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव  गोविंद संजय शिंदे  रा. बेट कोपरगाव असेबअसल्याचे सांगुन मोटार सायकल त्याचीच असल्याचे सांगितले. त्यास त्याचेकडेस असलेल्या मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत विचारपुस केली असता, त्याने ऊडवाऊडवीचे उत्तरे दिली. असता पोलिसांना  त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेकडेस असलेल्या मोटार सायकल बाबत अधिकची विचारपुस केली असता ती मोटार सायकल त्याचे मालकीची नसुन ती कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं. १३६ / २०२२ क. ३७९ भादवि मध्ये चोरी गेलेली मोटार सायकल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपी गोविंद संजय शिंदे रा. बेट कोपरगाव यास अधिक विश्वासात घेवून त्याचे ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता, त्याने त्याचा मित्र अशीष राममिलन कोहरी वय २० वर्षे रा.पुणतांबा चौफुली कोपरगाव मुळ रा. मंगोली, पोस्ट जगदिशपुर ता. मुसाफिरखाना, जि. अमेठी राज्य उत्तरप्रदेश व  नाना पानसरे पुर्ण नाव माहित नाही रा. कोपरगाव यांचे साथीने आम्ही सर्वांनी मिळुन ठिक ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी

केलेल्या आहेत. असे सांगितले. तेव्हा त्याचा साथीदार अशीष राममिलन कोहरी वय २० वर्षे रा. पुनतांबा चौफुली कोपरगाव यास ताब्यात घेवून त्याचेकडेस विचारपुस केली असता,  दोन्ही आरोपीनी ठिक ठिकाणाहुन मोटार सायकल, अॅक्टीव्हा स्कुटी, चोरी केलेल्या आहेत असे सांगुन चोरी केलेल्या मोटार सायकल काढुन दिल्या असुन त्या सर्व २० दुचाकी शहर पोलिसांनी जप्त करत  आरोपी गोविंद संजय शिंदे, अशीष राममिलन कोहरी या दोन्ही गुन्हेगारांना  अटक केली असुन त्यांचा साथीदार  नाना पानसरे पुर्ण नाव माहीती नाही हा फरार असुन त्याचा शोध चालु

आहे.


सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक  वासदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ आर.पी.पुंड हे करीत आहेत. सदरची तपास कारवाई  पोलीस अधिक्षक  मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक

श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधीकारी  संजय सातव शिडी यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक  वासुदेव देसले, पोहेकॉ आर.पी.पुंड, पो कॉ  जे पी तमणर,पो कॉ संभाजी शिंदे, पो कॉ राम खारतोडे, पो कॉ गणेश काकडे, यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत