राहुरी फॅक्टरी परिसरात अविवाहित तरुणाची गळफस घेऊन आत्महत्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी परिसरात अविवाहित तरुणाची गळफस घेऊन आत्महत्या

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगार वसाहत येथे आज मंगळवार दि 21 जून रोजी रात्री अविवाहित तरुणाने आत...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगार वसाहत येथे आज मंगळवार दि 21 जून रोजी रात्री अविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

 सौरभ नाना निकम (वय 19) असे आत्महत्या करणाऱ्या अविवाहित तरुणाचे नाव आहे. रात्री 8 वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस तब्बल दीड ते दोन तासानंतर दाखल झाले असून पंचनामा करण्याची प्रकिया सुरू होती.


दरम्यान आत्महत्येच्या घटनेबाबत राहुरी फॅक्टरीचे बिट हवालदार दिनकर गर्जे व सुनील निकम यांना घटनेबाबत तातडीने माहिती दिली मात्र तब्बल २ तास उलटले तरीही पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.मृतदेह तसाच लटकलेल्या अवस्थेत होता.


मृताचे नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी पोलिस गर्जे व निकम यांना फोनवर संपर्क करून घटनास्थळी येण्याची विनवणी केली. घटनास्थळी येण्याऐवजी दोघेही उंटावरून शेळ्या हाकत होते.


आम्हाला तेच काम आहे का? पोलिसांना अक्खा तालुका पहावा लागतो. 'जो मेला तो मेला' मेलेल्या माणसासाठी काय एवढी गडबड करायची असे 'उर्मट' उत्तर बिट हवालदार दिनकर गर्जे यांनी दिले.


घटनास्थळी नातेवाईकांनी पोलिसांच्या नावाने मोठा संताप व्यक्त केला.


राहुरी फॅक्टरी परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी बिट हवालदार निकम व गर्जे दोन्ही पोलीस कर्मचारी गुन्हेगारी रोखण्यास अपयशी ठरत आहे. अवैध व्यवसाय वाल्यांशी 'अर्थ'पूर्ण संबंध  आणि सामान्य नागरीकांना खालच्या पातळीवर वागणुक देत असल्याने या दोन्ही कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी राहुरी फॅक्टरी परिसरातील विविध सामाजिक संघटनेने केली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत