आंबी(वेबटीम) नुकतेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. त्यामुळे सर्वत्र पालकांची व विद्यार्थ्यांची विविध महा...
आंबी(वेबटीम)
नुकतेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. त्यामुळे सर्वत्र पालकांची व विद्यार्थ्यांची विविध महाविद्यालये तसेच विविध कोर्सेससाठी प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शाळा, कॉलेज प्रवेशासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते. त्यामध्ये जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रीमिलेअर, ई.डब्ल्यू.एस आदी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. वरील सर्व दाखले एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करावी अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, दाखले मिळवण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. असे आजपर्यंतचे चित्र आहे. अशावेळी अधिकारी, कर्मचारी, सेतू, आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी सेंटर यांजकडून मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाते. या सर्व बाबींचा विचार करून आपले कार्यालयात व आपले अधिनस्त तहसिल कार्यालयात वरील सर्व दाखले लवकरात लवकर देण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी नेमून ‘एक खिडखी योजना’ सुरु करावी. तसेच आपले अधिनस्त, सेतू, आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी सेंटर यांना सूचना देऊन या काळात विद्यार्थी आणि पालकांची अडवणूक करू नये अशा सूचना द्याव्यात अशी मागणी रोडे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत