सात्रळ/वेबटीम:- येथे जि. प. प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे योगादिन साजरा करण्यात आला. यावर्षी कृषी महाविद्यालय भानसहिवरे, नेवासा येथील ...
सात्रळ/वेबटीम:-
येथे जि. प. प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे योगादिन साजरा करण्यात आला. यावर्षी कृषी महाविद्यालय भानसहिवरे, नेवासा येथील कृषीकन्या काळे अनुजा, चोरमले पूजा, गावित युनिक, कर्डिले मोहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी ८ वा. शाळेमध्ये योगदिनाचा कार्यक्रम राबवला.
या कार्यक्रमामध्ये योगाचे विविध प्रात्याक्षिक प्रकार डॉ. धिरज पवार (PHC गुहा, योगशिक्षक) यांनी करुन दाखवले. त्याप्रमाणे येथील मुख्यध्यापक नंदकुमार नवगिरे सर, गायकवाड सर, शिंदे सर, प्राध्यापिका खरडे मॅडम , कामिनी मॅडम, सर्व विद्यार्थी, पालक व इतर शिक्षक वर्ग यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.
मुलांचे शरीर सुदृढ व निरोगी रहावे, योगाने राष्ट्रीय एकात्मता वाढावी, तसेचं त्यांना शिस्त चांगली लागावी म्हणून योगाचे प्रकार अतिशय उपयुक्त आहेत असे मोलाचे मार्गदर्शन डॉ. धिरज पवार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. अतुल दरंदले सर, प्राध्यपक एम. आर. माने सर, व प्राध्यापिका पि. जे. करपे मॅडम यांनी कृषीकन्यांना मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत