राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीत मागील काही महिन्यांपासून भूमिगत गटार योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.भूमिगत गटा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीत मागील काही महिन्यांपासून भूमिगत गटार योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.भूमिगत गटार योजनेचे काम राहुरी फॅक्टरी येथे काही भागात झाले पूर्ण झाले. या कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भूमिगत गटार योजनेमुळे खोदलेल्या रस्त्यावर चिखल साचत असल्याने नागरिक हतबल झाले आहे., भूमिगत गटार योजना पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी तातडीने रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी राहुरी फॅक्टरी येथील अँड. अजय पगारे यांनी केली आहे.
भूमिगत गटार योजनेचे काम देवळाली प्रवरासह ,राहुरी फॅक्टरी येथील सर्व भागात कामे अतिशय संथ गतीने मागील काही महिन्यांपासून सुरू आहे.यातच पहिल्याच पावसात येथील नागरिकांना चिखलाचा त्रास सहन करावा लागतोय.सर्व गल्लोगल्लीत चिखल व पाणी साचण्याचे प्रमाण आढळून येत आहे.
भूमिगट गटार योजनेचे ज्या ठिकाणचे कामे पूर्ण झाली त्या ठिकाणच्या रस्त्याचे कामे तातडीने पूर्ण करावी अशी मागणी यावेळी पगारे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत