देवळाली प्रवरा(वेबटीम) येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मंगळवार २१ जून रोजी प्रभागनिहाय प्रार...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मंगळवार २१ जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेसाठी एकूण १० प्रभाग असून नुकतेच प्रभागनिहाय आरक्षण जाहिरात करण्यात आले असून २१ नगरसेवक निवडून दिले जाणार आहे.
प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीत २२८२८ मतदार संख्या असून त्यात ११६६४ पुरुष मतदार तर १११८३ स्त्री मतदार आहेत.
प्रारूप मतदारयादी नगरपालिका आवारात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवार,कार्यकर्ते व मतदारांनी मतदार यादी चाळण्यासाठी गर्दी केली होती.
प्रभागनिहाय प्रारूप मतदारसंख्या खालीलप्रमाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत