अहमदनगर(वेबटीम) एकीकडे राज्यात शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप झाला आहे. तर दुसरी...
अहमदनगर(वेबटीम)
एकीकडे राज्यात शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप झाला आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातही राजकीय भूकंपाने हादरला आहे. या राजकीय भूकंपामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीने अहमदनगर जिल्ह्यात भाजपच्या गडाला सुरुंग लावला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केल. यासंदर्भातील ट्विट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज केले आहे.राष्ट्रवादीच्या धक्कातंत्रामुळे भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दोन तासापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील भाजपचे नेते तथा माजी जि.प. अर्थ व बांधकाम सभापती कैलासराव वाघचौरे, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकर, नगर तालुक्यातील माजी जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला या सर्व कार्यशील नेत्यांचे मी पक्षात मनापासून स्वागत करतो. आपल्या हस्ते समाजासाठी भरीव कार्य होवोत ही सदिच्छा असे ट्विट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत