पानेगांव (वार्ताहर)- राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक विकासाची कामं मार्गी ल...
पानेगांव (वार्ताहर)-
राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक विकासाची कामं मार्गी लागले असून निश्चितच जनतेच्या आशिर्वादाने समाधान लाभतं असल्याचं अहमदनगर जिल्हा परिषदेतील अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिलभाऊ गडाख पाटील यांनी खेडलेपरमानंद (ता.नेवासे) नूतन ग्रामपंचायत कार्यालय तसेच खुली व्यायाम शाळा लोकार्पण सोहळ्यात बोलतं होते
अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर हे होते.
सभापती गडाख यांनी आपल्या भाषणात म्हटले की,खरवंडी जिल्हापरिषद गटात असं गांव राहिले नाही कि,तिथे कामं मार्गी लागले नाही गटा बरोबरच तालुक्यात हि कोट्यवधी रुपयांचा निधी नामदार शंकरराव गडाख पाटील यांनी उपलब्ध करून जी न होणारी काम झाल्याने
जनतेत समाधान व्यक्त होत आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य ,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम तांबे यांनी नामदार शंकरराव गडाख तसेच सभापती सुनिल गडाख यांनी तालुक्यात व्यक्तिगत लाभाचा योजना बरोबरच सर्वच विकासाचे काम मार्गी लावल्याने पुर्वी असलेले खराब रस्त्यांनी यायचं म्हटलं की पाहुण्यांकडे जाता येत नसायचं आता पाहुण्याकडे आठवड्यात दोन- दोन वेळा जाण्याचा योग येत असल्याने विकास कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी सरपंच सौ योगिता राजेंद्र राजळे, उपसरपंच सौ.वंदना शिवाजी तुवर,मेजर राजेंद्र राजळे,जावेद इनामदार, संदिप केदारी, रमेश बनकर, रविंद्र बर्डे, दिलशान इनामदार,सौ.सुनिता वैरागर,सौ.नितू मोकाशी, सुर्यकांत केदारी, राजेंद्र बर्डे,सुर्यभान आघाव, दादासाहेब रोठे, अजित इनामदार, जालिंदर राजळे, दौलतराव तुवर, सुर्यकांत राजळे, अल्लूभाई इनामदार, सुखदेव राजळे,मुक्ताजी राजळे, प्रशांत केदारी, रोहिदास बर्डे,यूसुफ हवालदार, चंद्रकांत जाधव, काशिनाथ तुवर,नय्यूम इनामदार,मुळाचे संचालक संजय जंगले, रंगनाथ जंगले मुळा बॅंकेचे संचालक रमेश जंगले,युवा सेनेचे चंद्रकांत टेमक,पानेगांवचे उपसरपंच रामराजे जंगले, बबनराव जंगले,माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब होन,शिरेगांव संस्थेचे अध्यक्ष डॉ रमेश जाधव, खंडेराव जाधव, आदीं सह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रस्ताविक- तंटामुक्ती अध्यक्ष दगूबाबा हवालदार
सुत्रसंचलन- ग्रामविकास अधिकारी आर ई डौले
आभार-जावेद इनामदार यांनी मानले.
-राज्यात सत्ता समीकरणाचा बदलाचा हालचाली भाष्य न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामदार शंकरराव गडाख पाटील यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री संधी दिली असून उद्धवसाहेब ठाकरे यांचा मागे ठाम उभे राहणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत