राहुरी(प्रतिनिधी) गुहा येथील प्रेरणा ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष सुरेश गोरक्षनाथ वाबळे यांची फेर निवड करण्यात आली तर ...
राहुरी(प्रतिनिधी)
गुहा येथील प्रेरणा ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष सुरेश गोरक्षनाथ वाबळे यांची फेर निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मच्छिंद्र सोपान हुळुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मा.खा.प्रसादराव तनपुरे साहेब राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखालीबसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली .नवनिर्वाचित संचालक मंडळात मच्छिंद्र भाऊसाहेब शिंदे, डॉ. सुभाष बन्सी काकडे ,किशोर भागवत गागरे, राजेंद्र मुक्ताजी वर्पे,राजेंद्र सुखदेव गांडुळे ,अशोक मनोहर ओहोळ, सौ अलका ताई वेणुनाथ लांबे, सौ .लताताई वसंत कोळसे यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे विविध संस्था, व्यक्ती यांनी सत्कार केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. डी. खंडेराय यांनी काम पाहिले.संस्थेचे जनरल मँनेजर जी. एम्. चंद्रे यांनी त्यांना सहकार्य केले.
आजपर्यंत संस्थेच्या संचालक मंडळाच्या सर्वच निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. प्रेरणा मल्टीस्टेट चे उपाध्यक्ष विष्णुपंत वर्पे, प्रेरणा सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक उर्हे, प्रा.वेणुनाथ लांबे, अँड. जगन्नाथ डौले, गंगाधर चंद्रे, भाऊसाहेब चंद्रे, अशोक आंबेकर ,बाळासाहेब लांबे ,शिवाजी ,बबन कोळसे ,डॉ. विजय वाबळे,सुनील उर्हे ,काकासाहेब चंद्रे,संजय शिंदे, शरद वाबळे, शौकत सय्यद आदी मान्यवर या वेळी हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत