देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री. त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान उद्या शुक्रवार २३ ज...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री. त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान उद्या शुक्रवार २३ जून रोजी सकाळी ९ वाजता होणार असल्याची माहिती त्र्यंबकराज पायी दिंडी सोहळा समितीचे उपाध्यक्ष ह.भ.प बाबा महाराज मोरे यांनी दिली.
आपल्या देवळाली प्रवरा गावचे आराध्यदैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी यांचा पायी दिंडी सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या प्रेरणेने व भक्तपरिवार यांचे सहकार्याने व ह.भ.प. दुर्गाप्रसाद महाराज तिडके यांच्या अधिपत्याखाली आणि ह.भ.प. सुभाष महाराज विधाटे, ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री, ह.भ.प. बाबा महाराज मोरे, ह.भ.प. बाळासाहेब महाराज मुसमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार २४/६/२०२२ रोजी सकाळी ९ वाजता श्री. सत्यजित चंद्रशेखर कदम पाटील व सौ. प्रितीताई सत्यजित कदम यांचे विधिवत पूजन होऊन हस्ते प्रस्थान होणार आहे.
यानिमित्ताने भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे ह.भ.प सीताराम भाऊ ढुस, बाबासाहेब सांबारे, विठ्ठल टिक्कल,मच्छीन्द्र पठारे, देवराम शेटे, अण्णासाहेब महांकाळ, मंजबापू वरखडे व पायी दिंडी सोहळा समितीने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत