राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे कारखाना हद्दीतील अमरधामच्या शवदाहिनीचे लोखंड चोरणाऱ्या चार महिला रंगेहात पकडल्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे कारखाना हद्दीतील अमरधामच्या शवदाहिनीचे लोखंड चोरणाऱ्या चार महिला रंगेहात पकडल्या

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना हद्दीत असलेल्या अमरधाम मधील शवदाहिणीचे लोखंड तोडफोड करून चोरून नेणाऱ्या ४ महि...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)


 राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना हद्दीत असलेल्या अमरधाम मधील शवदाहिणीचे लोखंड तोडफोड करून चोरून नेणाऱ्या ४ महिलांना स्थानिक नागरिकांनी पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


डॉ.तनपुरे कारखान्याच्या जागेत असलेल्या अमरधामची देवळाली प्रवरा नगरपरिषदेने सुशोभिकरण करून नव्याने दोन शवदाहिनी बसवल्या होत्या या शवदहिणीचे लोखंडाचे तोडफोड करून लोखंड चोरी करण्याच्या घटना घडल्या असताना नागरीकांनी संताप व्यक्त केला होता.



 दरम्यान आज शुक्रवारी दुपारी अमरधाम ठिकाणावरून चार महिला शवदाहिणीचे लोखंड गोळा करून गोण्यांमध्ये भरून घेऊन जात असल्याचे आंबिकानगर परिसरातील नागरिकांनी पाहिले ही माहिती तनपुरे कारखान्याचे सुरक्षा रक्षक व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनाही दिली त्यांनतर राहुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रभाकर शिरसाठ यांनी तनपुरे कारखान्याच्या वाहनाद्वारे ४ महिला चोरट्यांना राहुरी पोलीस ठाण्यात पाठवले.चोरट्या महिलांनी मोठ्या प्रमाणात चोरून जमा केलेले लोखंड राहुरी पोलीस ठाण्यात पंचनाम्यासाठी पाठवले आहे.स्थानिक नागरिक व महिलांनी त्या चार चोरट्या महिलांना तुम्ही कुठल्या आहेत? कशाला चोरी करता? हे लोखंड घेऊन कुठे चालला? असे अनेक प्रश्न विचारले मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, महिला,तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






तनपुरे कारखाना हद्दीत असलेल्या अमरधामाची आंबिकानगर,वैष्णवी चौक, कारखाना कामगार वसाहत परिसरातील नागरिकांना उपयोग व्हावा या हेतूने देवळात प्रवरा नगरपालीकेने लाखो रुपये खर्च करून अमरधामचा कायापालट केला मात्र अंत्यविधी साठी गरजेचे असलेल्या शवदहिनीचे नुकसान करून लोखंडी चोरी करण्याच्या घटना वाढत होत्या आणि सदर लोखंड चोरणाऱ्या ४ महिला आज रंगेहात पकडल्याने त्यांच्यावर राहुरी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत