देवळाली प्रवराचे भूमिपुत्र जगदीश कदम यांच्या कंपनीच्या कामाची गिनीज बुक मध्ये नोंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराचे भूमिपुत्र जगदीश कदम यांच्या कंपनीच्या कामाची गिनीज बुक मध्ये नोंद

अकोला(वेबटीम):-  अमरावती ते अकोला हा मार्ग इतका खराब झाला होता की प्रवाशी अक्षरशः कंटाळले होते. पण हा अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर...

अकोला(वेबटीम):-

 अमरावती ते अकोला हा मार्ग इतका खराब झाला होता की प्रवाशी अक्षरशः कंटाळले होते. पण हा अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील 75 किलोमीटरचा रस्ता अवघ्या पाच दिवसात पूर्ण झाला आणि अखेर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये याची नोंद झाली आहे.देवळाली प्रवरा शहराचे भूमिपुत्र तथा पुणे स्थित राज इन्फ्रास्ट्रक्चरचे जगदीश कदम यांच्या कंपनीने हा विक्रम केला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम झाला आहे. काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे.


अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे विक्रमी बांधकाम 3 जूनपासून सुरू झाले असून 7 जून रोजी हा 75 किमीचा रस्ता बांधून पूर्ण झाला. 5 दिवसात 75 किमीचा रस्ता तयार करण्यासोबतच या कामाची नोंद गिनीज बुकमध्ये देखील झाली. राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असून महामार्गावरील लोणी ते बोरगावमंजू या 75 किमी रस्त्याचे बांधकाम बिटूमिनस काँक्रीट पद्धतीने झाले. यावेळी गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.


गडकरी म्हणाले, संपूर्ण देशाला अभिमान...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मला या टीमचं अभिनंदन करताना खूप आनंद होत आहे. राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि जगदीश कदम यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन. 75 किमी अखंड बिटुमिनस काँक्रीट रस्ता टाकण्याचे काम तुम्ही पूर्ण केलं. तुमच्या चिकाटी आणि कामाच्या बळावर नवे व्हिजन तयार होत आहे. सर्व इंजिनिअर आणि कामगारांचे आभार. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दात गडकरींनी कौतुक केलं आहे.


सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम 728 मनुष्यबळ

अमरावती ते अकोला या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अमरावतीच्या लोणी ते अकोल्याच्या मुर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम, 3 ते 7 जून दरम्यान करण्याचे नियोजन कंपनीने केले. राष्ट्रीय महामार्गावरील, अमरावती ते अकोला जिल्ह्यातील, चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने 3 जूनला सकाळी 6 वाजेपासून ते 7 जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत 'बिटुमिनस काँक्रिट'च्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम पूर्ण झाले. यासाठी 728 मनुष्यबळ वापरलं गेलं.


राजपथ इन्फ्राकॉनचा धाडसी प्रयत्न

राजपथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार पार पडला. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया (NHAI) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला गेला.

1 टिप्पणी

  1. Hong 1xbet Kong’s recent omicron outbreak, reportedly traced to flight attendants that violated their quarantine restrictions, solely strengthened the PRC’s dedication to this policy. Anyone returning to the PRC, Macau and Hong Kong will find themselves in quarantine under strict supervision. As such, any resumption of outbound tourism from China to other destinations in Asia is not going to happen for the foreseeable future. Any country that had relied on Chinese tourism prior to now want to|might need to} find other markets to serve. This leaves Korea’s on line casino industry in a very difficult position. Of the country’s 18 casinos, only one allows Korean residents to gamble.

    उत्तर द्याहटवा