भाजप तथा देवळाली प्रवरा विकास मंडळाचा पार पडला प्रचार नारळ शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भाजप तथा देवळाली प्रवरा विकास मंडळाचा पार पडला प्रचार नारळ शुभारंभ

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा शहरात नगरपालिका अथवा सोसायटीच्या माध्यमातून केलेली विकासकामे सभासदांपुढे ठेवून निवडणूकीला सामोरे जा...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

देवळाली प्रवरा शहरात नगरपालिका अथवा सोसायटीच्या माध्यमातून केलेली विकासकामे सभासदांपुढे ठेवून निवडणूकीला सामोरे जात आहोत.टिका करताना विरोधकांनी तारतम्य बाळगावे आमच्या वाटेला जाल तर याद राखा असा इशारा माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी दिला आहे.


देवळाली प्रवरा सोसायटी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा विकास मंडळाचा प्रचार नारळ शुभारंभ आज बागायत पीक प्रांगणात पार पडला प्रसंगी माजी आ.कदम बोलत होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी धोंडीभाऊ मुसमाडे हे होते.

यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,गोरख काका मुसमाडे,माजी नगराध्यक्ष मुरली आबा कदम, भीमजी अण्णा कदम,सोपान शेटे, सोपान भांड,शिवाजी काका मुसमाडे, बाळासाहेब मुसमाडे, अजीज इनामदार,मुनिर शेख,नानासाहेब सुखदेव पठारे, दशरथ खांदे,दत्तात्रय नालकर,अजित चव्हाण,रामभाऊ वरखडे,आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना माजी आ.कदम म्हणाले की,संस्था उर्जित अवस्थेत कशी आणता येईल यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. संस्थेच्या माध्यमातून केलेली कामे सभासदांपुढे ठेवून निवडणूकीला सामोरे जायचे आहे. टीका टिपण्णी करण्यापेक्षा विकासाला महत्व दिले जाणार आहे.आमच्या वाटेला जाऊ नका आमच्या कडे डोळे वटारून बघितले तर डोळे काढून हातात देऊ शकतो हा नुसता दम नाहीतर  खरोखर तशी कृती करु असा झणझणीत इशारा माजी आ.कदम यांनी दिला 

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की, विरोधकांनी आमच्यावर हुकुमशाही व दादागिरी करत असल्याची टीका केली या टीकेला उत्तर देताना सत्यजित कदम म्हणाले की, माझे पाय जमिनीवर आहेत हुकुमशाही व दादागिरी कोण करते हे जनतेस सांगण्याची गरज नाही याबाबत विरोधकांनी स्वत:ला तपासावे, आम्ही कुणाच्या एक पैशालाही लाचार नाही, सभासदांचे ऊस कारखान्याला देताना कोणी किती पैसे घेतले याचा हिशोब व यादी पुराव्यानिशी द्यायला भाग पाडू नका.

आपले संस्थेचे स्वत:चे कर्जाची परतफेड करता आली नाही व सभासदत्व टिकवता आले नाही, असे लोक विरोधी मंडळाचे नेतृत्व करायला पुढे सरसावले आहे, यांना स्वत:चे कर्ज फेडता आले नाही असे लोक संस्था जीवित ठेवू शकतील का? असा प्रश्न यावेळी बोलताना सत्यजित कदम यांनी केला.

यावेळी प्रीतीताई कदम, भारत शेटे,नामदेव कडू,माजी नगरसेवक डॉ.संदीप मुसमाडे, माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम, सचिन कोठुळे,आझाद मित्र मंडळाचे संदीप कदम, सचिन सरोदे,अशोक शेटे,प्रशांत कोठुळे,गंगाधर खांदे, कांता कदमराजू चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रसंगी देवळाली प्रवरा विकास मंडळाचे सर्व उमेदवार व सभासद  उपस्थित होते.

तर यावेळी माजी नगरसेवक सचिन ढुस,माजी चेअरमन शहाजी कदम, माजी नगरसेवक शिवाजी मुसमाडे, माजी चेअरमन बाळासाहेब मुसमाडे आदींची भाषणे झाली.

सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले तर आभार माजी नगरसेवक अमोल कदम यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत