राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- आमच्या नादी लागाल तर तुमची कुंडली सगळ्यांसमोर बाजार तळावर मांडू,सत्येची चढलेल्या मस्तीच्या जीवावर सर्वसामान्यांचा ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
आमच्या नादी लागाल तर तुमची कुंडली सगळ्यांसमोर बाजार तळावर मांडू,सत्येची चढलेल्या मस्तीच्या जीवावर सर्वसामान्यांचा छळ करण्याचा धंदा आता बंद करा असे प्रतिपादन देवळाली प्रवरा नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी केले.
देवळाली प्रवरा सोसायटी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवा मंडळाचा प्रचार नारळ शुभारंभ हनुमान मंदिर येथे पार पडला प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते.
या सभेच्या अध्यक्षस्थानी मच्छीन्द्र शिंदे हे होते.
यावेळी व्यासपीठावर अजित कदम, गणेश भांड, सुरेंद्र थोरात, अण्णासाहेब चोथे, संभाजी कदम, सुखदेव मुसमाडे, राजेंद्र कदम, सोपान चव्हाण, आदिनाथ कराळे, अशोक खुरुद, अमित कदम, विश्वास पाटील, वसंत कदम,बाळासाहेब खांदे,भगवान गडाख,शैलेंद्र कदम, उत्तमराव कडू, कारभारी वाळुंज, केदारनाथ चव्हाण, सुनील कराळे, बाळासाहेब कदम, दिनकर संसारे, गोवर्धन मुसमाडे, देवराम कडू, अन्सार इनामदार, करीम शेख, जगन्नाथ होले, अण्णासाहेब कराळे, रभाजी कराळे, प्रमोद कदम, बबनराव मुसमाडे, अण्णासाहेब शेटे, भाऊसाहेब गुंजाळ आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की,सहकारी संस्था मोडकळीस काढून सहकारी संस्था अंतर्गत छोटं मोठ्या संस्था बंद पाडून स्वतःच्या फायद्यासाठी संस्था सुरू केल्या डिव्हिडंड वाटप बंद करून सभासदांवर अन्याय सत्ताधाऱ्यांनी केला आहे.भाजपची सत्ता आली की आम्ही संघाचे कट्टर तर आघाडीची सत्ता आली की आम्ही दादांचे पाहुणे असा यांचा धंदा सभासद आता खपवून घेणार नाही सत्ता आली की सत्तेचे यांना मस्ती चढून सर्वसामान्यांचा छळ करतात हे आता बंद करा करता आलं तर चांगलं करा अन्यथा शांत रहा असा सल्लाही चव्हाण यांनी दिला.
प्रसंगी अजित कदम म्हणाले की, नगरपालिका व सोसायटी भाजप ताब्यात त्यांच्या ताब्यात असताना हुकुमशाही, दडपशाही पद्धत त्यांनी राबविली. आमच्या लोकसेवाच्या उमेदवारांना दबाव टाकून राजकारण खेळू पाहणाऱ्यांना सभासद यंदा थारा देणार नाही. लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून सभासदांच्या हिताच्या योजना राबविल्या जाणार असून सर्वांनी एकसंघ होऊन सोसायटी निवडणूकिला सामोरे जात आहोत.
यावेळी गणेश भांड म्हणाले की,सर्वसामान्यांसाठी आता ही लढाई लढायची आहे सत्ताधाऱ्यांनी टिका करण्यापेक्षा कामावर लक्ष दिले असते तर सोसायटी प्रगतीपथावर गेली असती देवळाली सोसायटीचे अनेक विभाग सत्ताधाऱ्यांनी बंद पाडले लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून आता सोसायटीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ असे यावेळी गणेश भांड यावेळी म्हणाले.
प्रसंगी लोकसेवा मंडळाचे सर्व उमेदवार व सभासद उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक नानासाहेब कदम यांनी केले तर सभेचे अध्यक्ष मच्छीन्द्र शिंदे अजित कदम,गणेश भांड,भास्कर तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार केदारनाथ चव्हाण यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत