नगर : वेबटीम शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली अ,नगर ...
नगर : वेबटीम
शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली अ,नगर जिल्ह्यातील वस्तीशाळा शिक्षकांनसह जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष श्री.दिनेश खोसे यांनी सांगितले.
शेवगाव तालुक्यातील वस्तीशाळा शिक्षकांचा मुळ नियुक्ती दिनांक सेवा पुस्तकात नोंदवण्या संदर्भात दिनेश खोसे व मुकेश गडदे व जिल्हाकार्यकारनीने प्रयत्न केल्यामुळे जिल्हा परीषदेने नुकतेच प्रत्येक तालुक्याला पञ निर्गमित केले.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नासंदार्भाने व प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची होत असलेली निवडणुक या अनुषंघाने शेवगाव पाथर्डी तालुक्याचा मेळावा आयोजित केला होता.यावेळी दिनेश खोसे बोलत होते. .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अ,जि.प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे होते.
राज्यातील 2005 नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शनसह प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाची सोडवणुक होण्यासाठी आमदार कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यां यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती सातत्याने पाठपुरावा करत आसल्याचे असल्याचे दिनेश खोसे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपिठावर जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे जि.सरचिटणीस सुनील कुमार मते महीला अध्यक्षा उषाताई येणारे जि.उपाध्यक्ष वसंतराव कर्डीले भाऊसाहेब ढाकणे पाराजी मुसमाडे दिनकर जेवे धनंजय कारंडे चांगदेव काकडे चंद्रकांत लोखंडे संतोष भवर शेवगाव ता.अध्यक्ष संदीप कातकडे पाथर्डी तालुका अध्यक्ष संदीप काळे बाबासाहेब विखे निवृत्ती आण्णा राजपुरे भाऊसाहेब माळवदे सौ.कांताताई वाघमोडे सौ.आशाताई पालवे सविता शिंदे पंढरीनाथ होन सुधाकर ढाकणे जनार्धन येळवंते सुधाकर पवार अनिल शिरसाठ संतोष वायकर बाबासाहेब आंधळे संतोष वायकर आप्पासाहेब निंबोरे सुनिल गंगावने दाविद खरचण व शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शिक्षक भारतीचे प्रमुख पदाधिकारी शिक्षक बंधु भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत