आंबी(वेबटीम) पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिरात राज्यस्तरीय कृषी व सामाजिक पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये सर्व कृषी व सामाज...
आंबी(वेबटीम)
पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिरात राज्यस्तरीय कृषी व सामाजिक पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये सर्व कृषी व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणिजनांना गौरविण्यात आले.
त्यामधे कृषी उद्योगात विषेश कामगिरी केल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील गोरख बापु चांडे यांना युवा प्रताप कृषी उद्योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी चांडे यांच्या सुविद्य पत्नी पुजा गोरख चांडे, कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस, मंगलाताई कडूस तसेच कृषी क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. गोरख चांडे यांचे बाळु चांडे, शोभा तमनर, अभिजित मुपीड यांसह सर्व मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, कृषी क्षेत्रातील मान्यवर आदींनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत