देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा बाजारतळ येथील गोरगरीब कुटुंबातील चहा विक्रेत्यास झालेली मारहाण निषेधार्थ आहे. या प्रकरणातील आरोपींवर ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा बाजारतळ येथील गोरगरीब कुटुंबातील चहा विक्रेत्यास झालेली मारहाण निषेधार्थ आहे.
या प्रकरणातील आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी यासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व उद्योजक गणेश भांड यांनी तातडीने पोलीस निरीक्षक दराडे यांच्याकडे मागणी केली आहे.
याबाबत आवाज जनतेशी बोलताना सुरेंद्र थोरात व गणेश भांड म्हणाले की,चहा विक्रेत्याला झालेल्या मारहाणी नंतर तातडीने पोलीस गाडी बोलावून आरोपी वर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
त्यांनतर तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे थोरात व भांड यांनी सांगितले. स्वतः मारहाण झालेल्या कुटुंबाला आरपीआयचे कुमार भिंगारे, माऊली भागवत यांनी भेट देऊन गुन्हा दाखल होण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात भेट देऊन मागणी केली त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
याप्रकरणातील आरोपींना योग्य ती शिक्षा होऊन गोर गरीब चहा विक्रेत्याला न्याय मिळावा असेही थोरात व भांड यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत